*एआय स्पोर्ट्स क्रांती: सशक्त युवाशक्ती व ५० ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उंची शक्य: एआय तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे*
*एआयमुळे स्पोर्ट्स आणि राष्ट्रीयव्यवस्थेत अजिंक्य अर्थक्रांती: एआय तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांचे संशोधननिष्कर्ष*
*नाशिक/दोईमुख:* राष्ट्रीय अर्थक्रांतीसाठी क्रीडाक्षेत्रात एआय वापर अपरिहार्य आहे. एआयमुळे खेळात सहभाग वाढून भारताची युवाशक्ती मजबूत होईल आणि देश ५० ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या उंचीवर पोहोचू शकेल. ३५ वर्षांखालील ६५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असल्यामुळे भारत जगातील सर्वात तरुण राष्ट्र आहे. क्रीडाक्षेत्रात एआय वापरल्यास २०२५ मध्ये ₹२४ अब्ज कोटी उत्पन्न वाढू शकते, जे २०४७ पर्यंत ₹२८१ अब्ज कोटीपर्यंत म्हणजे जवळजवळ १२ पट वाढू शकते. यामुळे जीडीपीत १.५ टक्के व राष्ट्रीय उत्पादकतेत १.२ टक्के वाढ होईल.
नियमित खेळामुळे युवकांची शारीरिक व मानसिक क्षमतेत सुधारणा होईल, प्रशिक्षणाचे ऑप्टिमायझेशन शक्य होईल आणि क्रीडाप्रेमी प्रेक्षकांचा सहभाग वाढेल. रिअल-टाइम डेटा, वेअरेबल डिवहायसेस, व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर), ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) व एआय-ड्रिव्हन ॲनालिटिक्सच्या माध्यमातून हे साध्य करता येईल. संशोधनानुसार, एआय वापरल्यास भारत जागतिक अर्थव्यवस्थेत १९.६ टक्के योगदान देणारी अमेरिका (२५ टक्के) व चीन (२२ टक्के) नंतर तिसरी महाशक्ती बनू शकेल असे एआय तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयातर्फे दोईमुख, अरुणाचल प्रदेश येथे राजीव गांधी सेंट्रल युनिव्हर्सिटीत तीन दिवसीय (१५ ते १७ ऑक्टोबर २०२५) ‘एमर्जिंग ट्रेंड्स इन स्पोर्ट्स सायन्सेस अँड हाय परफॉर्मन्स’ (ETSSHP-2025) आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले. यात मविप्रच्या क. का. वाघ महाविदयालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर सायन्स विभागात कार्यरत प्रा. किरणकुमार जोहरे “पल्स ऑफ द फ्यूचर: एआय अँड अॅडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीज फॉर परफॉर्मन्स, इंज्युरी प्रिव्हेन्शन, अँड फॅन एंगेजमेंट इन मॉडर्न स्पोर्ट्स” ह्या विषयावर विशेष व्याख्यान देत आपल्या राष्ट्रीय हितासाठीच्या संशोधन निष्कर्ष मांडत होते.
भारतामध्ये उत्कृष्ट स्पोर्ट्स कोचिंगचा गंभीर तुटवडा असून, चीन-अमेरिकेत एआय रोबोट न्यूज अँकर स्पोर्ट्स कमेंट्री करतात, रोबोट खेळाडूंसाठी बॅलन्स डाएट प्लॅन देत आहेत, अमेरिका-भारतात एआय रोबोट स्पोर्टस मेंटॉरिंग सुरू झाले आहे.
परिणामी अपघात व दुखापत कमी होतील, मधुमेह, हृदयरोग व लठ्ठपणाचा धोका कमी होईल, तसेच एलिट व ग्रासरूट स्तरावर शाळा, कॉलेज आणि जिममध्ये क्रीडा व इतरही मानसिक प्रशिक्षणासाठी एआयचा वाढलेला वापर भारताच्या युवापिढीला निरोगी, मजबूत व उत्पादक बनवेल. एआय विशेषज्ञांचा सरासरी पगार ₹२४ लाख असून अविशवसनीय वाटतील अशा वार्षिक १ हजार ६७० कोटी रुपये पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. जागतिक पातळीवर १७ कोटी तर भारतात ३ कोटींपेक्षा जास्त नवीन एआय रोजगारसंधी निर्माण होत आहेत यासाठी आपली तयारी हवी. येत्या काळात घरोघरी रोबोटिक कोचिंग व मेंटॉरिंग शक्य होईल असेही प्रा. जोहरे यांनी सांगितले.
डेटा गोपनीयता, उच्च खर्च व इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता ही आव्हाने असून, ५ जी ते २५ जी नेटवर्क, कठोर नैतिक एआय कायदे व धोरणे तसेच ग्रामीण क्रीडा जागरूकता यासारखे उपाय उपलब्ध आहेत. २०२५–३० मध्ये एआय लॅब्स व पायलट स्पोर्ट प्रोजेक्ट्स सेंटर्स, २०३०–४० मध्ये ग्रामीण आरोग्य जागृकतेवर भर आणि २०४०–४७ मध्ये संपूर्ण क्षेत्रांत एआय लागू करण्याचा तीन टप्प्यांचा कृती आराखडा देखील प्रा. किरणकुमार जोहरे यांनी यावेळी सादर केला.
त्यांना संशोधनासाठी मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, प्राचार्य प्रोफेसर डॉ. सुरेश जाधव, क्रीडा-संचालक प्रा. हेमंत पाटील, आयक्यूएसी समन्वयक प्रा. भगवान कडलग आदिंचे प्रोत्साहन लाभले.