श्रुती ठोंबरे आणि शीतल डोंगरे यांच्याकडून सायबर शिक्षा जनजागृती अभियान

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर : शहरातील कमला महाविद्यालयाच्या वतीने कोल्हापूर शहर तसेच परिसरातील शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा या विषयाचबद्दल माहिती दिली जात आहे. समाजात सायबर सुरक्षिततेची जाणीव वाढवणे हा या उपक्रमाला मुख्य उद्देश आहे . यामध्ये विद्यार्थिनींना प्रशिक्षित करून त्यांना सायबर वॉरियर्स म्हणून नियुक्त केले जात आहेत. तसेच हे सायबर वॉरियर्स समाजात सायबर सुरक्षा , मोबाईलचा सुरक्षित वापर त्याच बरोबर मोबाईल वापरताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करत आहेत.

कमला महाविद्यालय कोल्हापूर (स्वायत्त) व क्विक हील फाउंडेशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा उपक्रम राबवला जात आहे . या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाच्या बीसीए विभागातील विद्यार्थिनींची सायबर वॉरियर म्हणून निवड करण्यात आली आहे श्रुती ठोंबरे आणि शीतल डोंगरे यांनी विविध ठिकाणी जाऊन सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या विषयाबाबत जनजागृती केली. यामध्ये कॉलेजमधील विद्यार्थी, शाळेतील विद्यार्थी, पोलिस स्टेशन आणि रिक्षा ड्रायव्हर्स यांना सायबर सुरक्षिततेबद्दल, सोशल मीडियाचा योग्य वापर, ऑनलाइन फसवणूक, आर्थिक फसवणूक टाळण्याचे उपाय याबाबत मार्गदर्शन केले.

श्रुती ठोंबरे आणि शीतल डोंगरे यांनी घेतलेला हा उपक्रम सर्व स्तरातील लोकांपर्यंत जागरूकता पोहोचवणारा ठरला.

उपक्रमातील विद्यार्थिनींना प्राचार्य डॉ तेजस्विनी मुडेकर , बीसीए विभाग प्रमुख रोहिणी लोकरे तसेच सहाय्यक शिक्षक निलेश क्षीरसागर,फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, अजय शिर्के, गायत्री केसकर, दिपू सिंग यांनी मार्गदर्शन केले .

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.