अंबाबाईच्या कृपेने कोल्हापूरचा दसरा राज्याच्या महोत्सवांच्या शिखरावर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापुरातला दसरा आता महाराष्ट्राच्या दिनदर्शिकेत – पर्यटनाला नवा उभारीचा टप्पा

कोल्हापूर |  कोल्हापूरच्या अभिमानाचा शाही दसरा महोत्सव आता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत “राज्य प्रमुख महोत्सव” म्हणून घोषित झाला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.

परंपरा आणि शाही थाट

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून साजरा होणारा हा शाही दसरा, म्हैसूरच्या दसऱ्याइतकाच लोकप्रिय होत आहे. या महोत्सवात शिवकालीन शस्त्रप्रदर्शन, युद्धकला, लोककला, लोकनृत्ये यांचे आयोजन होते. यामुळे सांस्कृतिक वारसा जिवंत राहतो आणि नव्या पिढीला आपल्या इतिहासाची नाळ जोडली जाते.

अंबाबाई मंदिर आणि भवानी मंडपाचा ऐतिहासिक योग

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिराच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात दरवर्षी ३०–४० लाख भाविक देशभरातून कोल्हापुरात येतात. यावर्षी खास योगायोग असा की भवानी मंडप कमानीचे उद्घाटन २ ऑक्टोबर १८३४ रोजी दसर्‍यादिवशी झाले होते. त्यामुळे यंदा भवानी मंडपाला १९१ वर्षे पूर्ण होत आहेत.

पर्यटन आणि विकासाचा नवा अध्याय

पन्हाळगड, जोतिबा मंदिर, दाजीपूर अभयारण्य, कणेरीमठ, आंबा घाट, खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर यांसारखी स्थळे कोल्हापुरात पर्यटकांना आकर्षित करतात. राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने भाविक व पर्यटक आता मुक्कामी थांबून या ठिकाणांना भेट देतील. यामुळे स्थानिक रोजगार, पर्यटन उद्योग व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नुकताच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेल्या मराठा लष्करी भूप्रदेश या शृखंलेतील किल्ले पन्हाळगड तसेच श्री क्षेत्र जोतिबा मंदीर, गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य, कणेरीमठ, आंबा घाट, खिद्रापूर येथील स्थापत्य कलेसाठी जगप्रसिद्ध कोपेश्वर मंदीर इत्यादी पर्यटनाच्या दृष्टीने अनेक प्रेक्षणीय स्थळे उपलब्ध आहेत. तसेच पर्यटकांना राहण्यासाठी मुबलक प्रमाणात हॉटेल्स, लॉजिंग, धर्मशाळाही उपलब्ध आहेत. त्यामुळे दसरा महोत्सवास राज्याचा मुख्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे पर्यटक कोल्हापूर मध्ये किमान दोन दिवस मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी पन्हाळा किल्ला, नृसिंहवाडी इत्यादी स्थळांना भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेऊ शकतील. यामुळे कोल्हापूरच्या स्थानिक रोजगारमध्ये वाढ होण्यास तसेच विकासदर वाढीस मदत मिळू शकेल. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी कोल्हापूर शाही दसरा महोत्सवास राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करून मंत्रालयीन स्तरावर विशेष पाठपुरावा केला, त्यामुळेच कोल्हापूर शाही दसरा महोत्सवाचा पर्यटन विभागामार्फत सन 2025-26 या वित्तीय वर्षातील आयोजित केले जाणाऱ्या महोत्सवाच्या दिनदर्शिकेमध्ये प्रमुख पर्यटन महोत्सव (सन 2025-26) या यादीत समावेश झाला आहे

जिल्हाधिकाऱ्यांचा विशेष पाठपुरावा

 2023 साली दसरा महोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याबाबत घोषणा झाली होती तथापि त्यावर अद्यापपर्यंत काही कार्यवाही झाली नव्हती. मात्र दरम्यानच्या कालखंडात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.अखेर दिनांक 11 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक विभागाकडील परिपत्रकात कोल्हापूरचा दसरा महोत्सव हा ‘ राज्य महोत्सव ‘ म्हणून समावेशित करण्यात आला .पर्यायाने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला .असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .

कोल्हापूरचा नवा अभिमान हा निर्णय म्हणजे कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान आणि पर्यटन विकासाचा ऐतिहासिक टप्पा. खरंच, कोल्हापुरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

आजच आपल्या हक्काची लक्झरीयस बस निवडा.. आरामदायी, आनंददायी प्रवास करा

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.