पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्रात एक उल्लेखनीय कामगिरी घडली आहे. दंत शस्त्रक्रिया विभागात तब्बल १२ तास चाललेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या ऑपरेशनमध्ये, एका महिलेला जबड्यातील कर्करोगग्रस्त गाठ काढून तिचा जबडा पुन्हा तयार करण्यात आला. अजित लोकरे आणि दंतशल्य चिकित्सा विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती डॉ. अमोल लाहोटी यांनी दिली.
या शस्त्रक्रियेमुळे केवळ तिचे आयुष्य वाचले नाही, तर तिच्या चेहऱ्याचा आत्मविश्वासही पुन्हा जागवला गेला. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने अत्यंत कौशल्याने ही प्रक्रिया पार पाडली, ज्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एक नवा मापदंड निर्माण झाला आहे.या यशस्वी शस्त्रक्रियेने सीपीआर रुग्णालयाच्या क्षमतेवर विश्वास अधिक दृढ केला आहे, आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी उच्च दर्जाची सेवा उपलब्ध होऊ शकते, हे सिद्ध केले आहे.
रुग्णालयात जवळपास ६ लाख रुपये खर्च येणारी ही शस्त्रक्रिया सीपीआर येथे पूर्णतः मोफत करण्यात आली. डॉ. गायत्री कुलकर्णी, डॉ. प्रियांका मावडकर, डॉ. नितीन जैनबाल, डॉ. प्राची पन्हाळे, डॉ. हेमंत देशमुख, डॉ. शिवप्रसाद हिरुगडे, डॉ. उल्हास मिसाळ, प्लास्टिक सर्जन डॉ. प्रशांत चौधरी यांच्या सहकार्यातून शस्त्रक्रिया यशस्वी केली.
राधानगरी तालुक्यातील या महिलेवर तीन वर्षांपूर्वी जबड्यातील गाठ काढण्याची अवघड शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात करण्यात आली होती; मात्र पुन्हा त्यांच्या जबड्यात कॅन्सरसदृश गाठ झाल्याने ती महिला आठवडाभरापूर्वी उपचारासाठी सीपीआर येथे दाखल झाली होती. तिच्या जबड्यातून ती गाठ काढून त्या ठिकाणी पायाचे हाड जबड्याचा आकार देऊन पुन्हा बसवण्यात आले. जवळपास १२ तास परिश्रम घेत सीपीआर दंतरोग विभागातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी केली.
j
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.