आम्ही प्रयत्नशील…अरुंधती महाडिक! काय करणार ते केले असे स्पष्ट

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

भागीरथी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सभा खेळीमेळीत !

महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबन या उद्देशाने स्थापन झालेल्या भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीत मोठ्या उत्साहात पार पडली. अध्यक्ष सौ. अरुंधती महाडिक यांनी सांगितले की, संस्थेवरील जनतेचा विश्वास वाढल्यामुळे आर्थिक प्रगती जलद गतीने होत आहे. लवकरच संस्थेचे कामकाज डिजिटल आणि ऑनलाईन माध्यमातून करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

  • गेल्या १५ वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या पतसंस्थेचे सध्या ३,२०० सभासद असून ठेवी २ कोटींपेक्षा जास्त आहेत. गेल्या वर्षी ६४ लाखांच्या कर्जवाटपाने पतसंस्थेने चांगला नफा कमावला आहे.

सभेत भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक, तज्ञ संचालक पृथ्वीराज महाडिक आणि इतर संचालक उपस्थित होते. त्यांनी पतसंस्थेची प्रगती कौतुकास्पद असल्याचे म्हणत, महिलांना सामाजिक व आर्थिक दृष्टीने प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

सौ. अरुंधती महाडिक यांनी सांगितले की, “भागीरथी पतसंस्थेने केवळ आर्थिक मदतच केली नाही तर सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. महिलांनी या माध्यमातून आर्थिक स्थैर्य प्राप्त करावे, हीच आमची इच्छा आहे.”

आपल्या मतांद्वारे आणि अनुभवांद्वारे या प्रेरणादायी संस्थेबद्दल आपली भूमिका कमेंटमध्ये नक्की सांगा! आणि सांगायला विसरू नका, सोशल मिडीयावर बातमी शेअर करणे ही आपल्या समाजासाठी मोठी मदत ठरू शकते! भागीरथी पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांनी जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करावे, असे आवाहनही सौ. महाडिक यांनी केले. यावेळी सभासदांच्यावतीनं सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्मिता माने, प्राजक्ता घोरपडे, अर्पिता जाधव, प्रियांका अपराध, पुष्पा पोवार, भाग्यश्री शेटके, मंगल बनसोडे यांच्यासह सभासद उपस्थित होते.

महिला बचत गटांना कर्जपुरवठा करण्याची सूचनाही पृथ्वीराज महाडिक यांनी केली. तर सौ. अरूंधती महाडिक यांनी, भागीरथी पतसंस्था आणि सभासद महिला यांच्यात गेल्या दोन वर्षात अतुट नातं निर्माण झाल्याचे नमुद केले. केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता या पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे, असे त्यांनी नमुद केले.

 

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.