वीज ग्राहकांच्या १२३८ तक्रारींचा जाग्यावर निपटारा, ग्राहकांकडून समाधान

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

महावितरणच्या ग्राहक मेळाव्यांचा १२७८ ग्राहकांनी घेतला लाभ

कोल्हापूर : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत उपविभागीय स्तरापर्यंतचे ग्राहक मेळावे घेण्याचे निर्देश मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले होते. सोमवार (दि.८) रोजी शाखा कार्यालयांपर्यंत एकूण १९६ ठिकाणी घेण्यात आले. त्या मेळ्याव्यांचा लाभ जिल्ह्यातील १२७८ ग्राहकांनी घेतला. यापैकी १२३८ ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा जागेवर करण्यात आला. तर प्रलंबित ४० तक्रारीं विहित वेळेत निकाली काढण्याचे आदेश कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी दिले आहेत. तक्रारींचा निपटारा झाल्याने सदर मेळाव्यांप्रती ग्राहकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

कोल्हापूर शहर विभागात १२ ठिकाणच्या मेळाव्यांमध्ये प्राप्त १३८ पैकी १३८ तक्रारी, कोल्हापूर ग्रामीण १ विभागातील ८७ ठिकाणच्या मेळाव्यांमध्ये ३५३ पैकी २३७ तक्रारी, कोल्हापूर ग्रामीण २ विभागातील ३६ ठिकाणच्या मेळाव्यांमध्ये ११० पैकी ९९ तक्रारी, गडहिंग्लज विभागातील २५ ठिकाणच्या मेळाव्यांमध्ये २०८ पैकी १९९ तक्रारी, इचलकरंजी विभागातील ९ ठिकाणच्या मेळाव्यांमध्ये २०६ पैकी २०५ तक्रारी, जयसिंगपूर विभागातील २७ ठिकाणच्या मेळाव्यांमध्ये २६३ पैकी २६० तक्रारी जागेवर तात्काळ सोडवण्यात आल्या.

                  महावितरणने कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या मार्गदर्शनात जुलै महिन्यात घेतलेल्या मेळाव्याचा ६१२ ग्राहकांनी तर ऑगस्ट महिन्यात घेतलेल्या मेळाव्याचा १४४० ग्राहकांनी लाभ घेतला आहे. महावितरण महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या सोमवारी सकाळी १०.०० ते दुपरी ०१.३० पर्यंत शाखा कार्यालय स्तरापर्यंतचे ग्राहक मेळावे घेत आहे. ग्राहकाने दाखल तक्रारींत प्रामुख्याने नवीन वीज जोडणी, वाढीव वीज बिले, सौर कृषी पंप, कृषिपंप ग्राहकांचा वीज भार कमी करणे, स्मार्ट टीओडी मीटरच्या तक्रारी व विविध शंका यांचा प्रामुख्याने समावेश होता.

या मेळाव्यात स्मार्ट टीओडी मीटरच्या संबधीत सर्वच तक्रारींचे प्रात्यक्षिकांसह निरसण करण्यात आले. यावेळी ग्राहकांना पीएम सुर्यघर योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देणेकरीता कुसुम बी व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी योजनांची माहितीही देण्यात आली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.