विवेकानंद कॉलेजमध्ये संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे जयंती उत्साहात
कोल्हापूर : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या कार्याला खंबीर साथ देत संस्थेच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या 98व्या जयंतीनिमित्त विवेकानंद कॉलेजमध्ये कार्यक्रम झाला.
‘संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे : प्रेरणादायी जीवनप्रवास’ या विषयावर बोलताना प्रमुख पाहुणे जयसिंगराव सावंत म्हणाले, “विद्यार्थिनींनी संस्थामातांचा आदर्श घेऊन आपले आयुष्य घडवावे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे होते. त्यांनी संस्थामाता शिस्तप्रिय, त्यागमूर्ती असून विद्यार्थ्यांवर स्वतःच्या मुलांपेक्षा अधिक माया करत असत, असे सांगितले.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात प्रतिमापूजन, रोपारोपण व संस्था प्रार्थना झाली. स्वागत प्रा. शिल्पा भोसले यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले.
जयंतीनिमित्त भारती विद्यापीठ, कॉलेज ऑफ आयुर्वेद ॲण्ड हॉस्पीटल, कोल्हापूर यांच्या वतीने महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन झाले.
समारंभास डॉ. संपदा टिपकुर्ले, डॉ. श्रुती जोशी, डॉ. कविता तिवडे, प्रा. पल्लवी देसाई, रजिस्ट्रार एस.के. धनवडे, तसेच प्राध्यापक, प्राध्यापिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.