विजय प्रभाकर हावळ यांची “संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन” कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर – संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाच्या अनुषंगाने, कोल्हापूर जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी श्री. विजय प्रभाकर हावळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रसार व समाजाच्या संघटनबळ वाढविण्यासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे.

या नियुक्तीमागे आदरणीय भास्करभाऊ टोंपे, ईश्वरभाऊ धिरडे, अनंतभाऊ जांगजोड, उषाताई पोरे, संजय नेवासकर आणि महेश मांढरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.या वेळी विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवली. त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष मिनलताई कुडाळकर, पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक संतोष मुळे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष शारदा जौंजांळ (मामी), महिला संघटक प्रमुख सुचिता महाडिक, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख दिनकर पंतगे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पुकाळे, जिल्हा उपाध्यक्ष भारत कोळेकर आणि जिल्हा संघटक बाळासाहेब वर्णे आदी मान्यवरांचा समावेश होता.

या नियुक्तीनंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी महासंमेलन अधिक प्रभावी व भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी सर्व कार्यकर्ते कटिबद्ध झाले आहेत.

 …सर्वांचा विश्वास आणि प्रेम हीच माझी खरी ताकद “

संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. ही केवळ सन्मानाची बाब नसून, समाजासाठी अधिक जबाबदारीने कार्य करण्याची संधी आहे, असे मी मानतो. संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रसार करणे, समाजामध्ये ऐक्य, बंधुता आणि मूल्याधिष्ठित विचार रुजवणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट असेल. यासाठी माझ्या सहकाऱ्यांचा, मार्गदर्शकांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे.कोल्हापूर जिल्ह्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा लक्षात घेता, येथील कार्य अधिक प्रभावी आणि व्यापक स्वरूपात पार पाडण्यासाठी मी व माझी संपूर्ण टीम कटिबद्ध राहू.

– विजय प्रभाकर हावळ,
कार्याध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा
संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन

जय श्री नामदेव!

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.