पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
‘कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या अनोख्या उपक्रमाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात 28 ऑगस्टपासून आतापर्यंत 223 मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात 10,203 नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर 1,661 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे, 2,001 नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आले, आणि 872 जणांनी अवयव दानाची नोंदणी केली. हे अभियान पुढेही संपूर्ण गणेशोत्सवात राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली आहे.
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाने कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्यसेवेचा नवा पायंडा पाडला असून, येत्या काळातही असेच उपक्रम राबवले जाणार आहेत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आणि धर्मादाय रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहभागाने हा उपक्रम राबवला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गणेश मंडळांनी या मोहिमेत भाग घेतला असून, मंडपांजवळील शिबिरांमध्ये गणेशभक्त, स्थानिक नागरिकांची मोफत तपासणी केली जात आहे. यामधून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या आजारांचे निदान करून रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.
गणेश मंडळांचा जनजागृतीत मोलाचा वाटा गणेश मंडळांनी बॅनर आणि पत्रकांद्वारे या उपक्रमाची व्यापक जनजागृती केली. परिणामी, हजारो नागरिकांनी लाभ घेतला. ही मोहीम केवळ तपासणीपुरती मर्यादित नसून, सातत्यपूर्ण आरोग्य जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे.लोकाभिमुख उपक्रमाचा आदर्श मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने राबवलेला हा उपक्रम जनहिताचा उत्तम आदर्श ठरला आहे. गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक उत्सवाला आरोग्यसेवेची जोड देणारी ही अभिनव संकल्पना नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे.
गणेशोत्सव राज्य महोत्सवांतर्गत गुरुवार, दि. ०४ सप्टेंबर रोजी “जल्लोष माय मराठीचा” सांस्कृतिक कार्यक्रम
राज्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेत गणेशोस्तव हा अत्यंत लोकप्रिय आणि राज्याची देशविदेशात सांस्कृतिक ओळख निर्माण करून देणारा उत्सव असल्याने महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयाद्वारे गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा महसूल प्रशासनामार्फत दिनांक ०४ सप्टेंबर रोजी सायं. ०६ ते ०९ या कालावधीमध्ये “जल्लोष माय मराठीचा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन, दसरा चौक कोल्हापूर येथे केलेले आहे. तरी या कार्यक्रमास सर्व कोल्हापूरकरांनी हजेरी लावून उस्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करणेत येत आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.