कोकणातलं “वैभव” जाणार : आता भाजपवासीय होणार!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

भाजपचा मनसेला दे दणका,
वैभव खेडेकर लकरच भाजप वासिय होणार !

रत्नागिरी: गणेशोत्सवाच्या धामधुमीत कोकणमध्ये मोठी राजकीय घडामोडी झाली जवळपास 30 वर्षाची पक्षाचा कार्यकर्ता तसेच पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खाते उघडून देणारे मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना बडतर्फ करण्यात आले. वैभव खेडेकर यांची मनसेचा कोकणी चेहरा म्हणून ओळख होती आता त्या गोष्टीला पूर्णविराम मिळत आहे. परंतु सामाजिक व राजकीय प्रवाहात राहण्यासाठी वैभव खेडेकर हे 4 सप्टेंबर रोजी मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपवासीय होत आहेत. आज मंत्री नितेश राणे हे खेड दौऱ्यामध्ये असताना त्यांनी वैभव खेडेकर यांच्या घरच्या गणपतीचे देखील दर्शन घेतले तदनंतर एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत वैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशाची जाहीर घोषणा केली.

मागील दोन वर्षापासून वैभव खेडेकर हे इतर पक्षात जाणार अशा चर्चा रंगत होत्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच भाजपचे नाव देखील आघाडीवर होते. यामुळे, मनसे व वैभव खेडेकर यांच्यामध्ये दुरावा वाढत चालला होता. त्यातच, मागील महिन्यात “शतप्रतिशत कोकण’ या मिशन अंतर्गत मंत्री नितेश राणे यांनी लवकरच एक मोठे राजकीय व्यक्तिमत्व भाजपामध्ये येणार असल्याची भविष्यवाणी केली होती. मागील आठवड्यामध्ये वैभव खेडेकर यांना पक्षाने निलंबनाचे पत्र सादर केल्यानंतर वैभव खेडेकर भाजपमध्ये जाणार हे अधोरेखित झाले होते आज मंत्री नितेश राणे यांनी अधिकृतपणे ती घोषणा केली.

मनसे निलंबन नंतर अनेक प्रसारमाध्यमांनी वैभव खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपले राजकीय जीवन अखंडीत ठेवणार असणार सांगितले होते. पक्षामध्ये आपल्याला दुय्यम स्थान देण्यात येत होते तसेच आपली बाजू मांडण्याची संधी देखील दिली नाही. आपण मागील निवडणुकात पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार व समर्थनार्थ जिल्ह्यात भाजपचे काम करत होतो. साहजिकच, यामुळे भाजप नेत्यांशी जवळीक वाढत गेली तसेच मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची रखडलेली कामे देखील भाजपाच्या सत्तेच्या माध्यमातून केली. नुकतीच एका कार्यकर्त्याची तडीपारी रोखण्यासाठी मी मंत्री नितेश राणे यांना भेटलो होतो व त्यांनी ती देखील माझ्यासाठी रोखली. याबाबत उलट संदेश काहीजणांनी पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहचविला. मात्र, मनसे पक्षश्रेष्ठींनी कोणतीही खातरजमा न करता माझ्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली याचे मला मोठे दुःख राहणार आहे.

कोकण मध्ये सध्या रत्नागिरी जिल्ह्यात व खेड तालुक्यामध्ये वैभव खेडेकर यांचा मोठा प्रभाव आहे. तसेच ऑक्टोंबर नंतर स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषद व नगरपालिका निवडणुका असल्याने खेड नगरपरिषदेवर असलेली वैभव खेडेकर यांची पकड निश्चितच मजबूत राहणार आहे. परंतु, वैभव खेडेकर यांचा फायदा भाजपाला रत्नागिरी जिल्ह्यात देखील होणार आहे. वैभव खेडेकर यांच्या दाव्यानुसार त्यांच्यावर झालेल्या अन्यायाने फक्त रत्नागिरी जिल्ह्यातच नाही तर तळ कोकण मधून देखील मनसे पदाधिकाऱ्यांची सहानभूती त्यांना आहे.

वैभव खेडेकर यांच्या या दाव्यामुळे आगामी काळात कोंकणात मनसेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता राजकीय विश्लेषक करत आहेत. मंत्री नितेश राणे यांनी आज भरगच्च पत्रकार परिषदेत वैभव खेडेकर यांना मानसन्मान व ताकद देणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत “शत प्रतिशत कोकण’ हे मिशन किती सफल होते हे पाहावे लागणार.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.