पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संलग्न प्राथमिक दूध संस्थांची संपर्क सभा राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली.
सभेत बोलताना नविद मुश्रीफ म्हणाले की, ➡️ गोकुळची यावर्षीची वार्षिक उलाढाल तब्बल ४ हजार कोटींवर पोहोचली आहे. ➡️ संघात ५१२ कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ➡️ दूध उत्पादकांना एका रुपयातील ८२ पैसे थेट त्यांच्या हाती दिले जातात. ➡️ म्हैस दूध संकलन वाढीसाठी नव्या योजना आणि सुविधा राबविल्या जात आहेत.“अमूलनंतर देशभरात गोकुळ दूध संघाचे नाव सन्मानाने घेतले जाते. गोकुळ हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा संघ आहे,” असे ते म्हणाले.
सभासदांसाठी महत्वाची घाेषणा – ✔️ संघाने २५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ✔️ जनावरांच्या पोषणासाठी ‘रेडी टू इट ओली व सुकी वैरण प्रकल्प’ सुरू होणार आहे. ✔️ यामुळे दूध उत्पादनात मोठी वाढ होईल व उत्पादकांना अधिक फायदा मिळेल.
“म्हैस दूध वाढीसाठी सर्वांनी पुढे यावे” – अरुण डोंगळे
माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गोकुळने गेल्या चार वर्षांत अनेक सभासद हिताचे निर्णय घेतले आहेत. राधानगरी तालुक्यातील म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे ठळक मुद्दे :
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात.
संचालक अभिजित तायशेटे यांचे स्वागत व किसन चौगले यांचे प्रस्ताविक.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.