समाज सक्षमीकरणासाठी २१ ठराव-महाबळेश्वर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चिंतन शिबीर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

महाबळेश्वर 🙁 रुपेश आठवले)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) तर्फे आंबेडकरवादी साहित्यिक, विचारवंत व पक्षनेते यांच्या उपस्थितीत २७ व २८ ऑगस्ट २०२५ रोजी महाबळेश्वर येथे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात पक्षाच्या सक्षमीकरणासाठी तसेच सामाजिक-राजकीय प्रश्नांवर २१ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

या शिबिरास राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदासजी आठवले मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते, तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. राजाभाऊ सरवदे अध्यक्षस्थानी होते. शिबिराचे संचालन प्रा. शहाजी कांबळे (राज्य संघटन सचिव) यांनी केले.

महत्त्वाचे ठराव :

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित व्यापक रिपब्लिकन पक्ष उभारणी.

  • १५ ऑक्टोबर २०२५ पासून खाजगी क्षेत्रात आरक्षणासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन.

  • बोधगया महाबोधी महाविहाराचे प्रशासन भारतीय बौद्धांच्या ताब्यात द्यावे.

  • भुमिहीनांना ५ एकर जमीन, कंत्राट पद्धती बंद करून कायम नियुक्ती.

  • आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवावे.

  • पाली भाषेचे केंद्रिय विद्यापीठ स्थापन करावे.

  • आरक्षण धोरण प्रभावी करण्यासाठी केंद्रिय आरक्षण कायदा तयार करून तो संविधानाच्या नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करावा.

  • SC/ST लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट तरतुद अनिवार्य करावी.

  • झोपडपट्ट्यांचे नियमीतीकरण, घराची मर्यादा ४५० स्क्वे. फूट करावी.

  • विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ, OBC साठी उत्पन्न मर्यादा १२ लाख करावी.

  • महिला आरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून ३३% आरक्षण द्यावे.

  • प्रत्येक तालुका-जिल्हा-विभाग पातळीवर वसतिगृहांची उभारणी.

  • समाजकार्य विद्यापीठ स्थापन करावे.

  • न्यूयॉर्क येथे डॉ. आंबेडकर यांचे म्युझियम व्हावे यासाठी प्रयत्न.

  • शेतकऱ्यांना हमीभाव, शेतमजूर, बेरोजगार, महिला व युवकांसाठी स्वतंत्र आघाड्या.

  • SC/ST व्यक्तींना विद्यापीठांमध्ये कुलगुरु म्हणून संधी.

  • मागासवर्गीय आर्थिक महामंडळांचे बजेट २००० कोटी करावे.

  • नाशिक ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्यावे.

शिबिरातील हे सर्व ठराव सुचक प्रा. शहाजी कांबळेअनुमोदक मा. अशोक गायकवाड यांच्या सहमतीने सर्वानुमते मंजूर झाले.

या शिबिराद्वारे पक्षाच्या सक्षमीकरणाला नवा वेग मिळेल आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया समाजाच्या उत्थानासाठी अधिक सक्षमपणे उभी राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.