साहित्यिक व विचारवंतांसह रिपब्लिकन पक्षाचे विचारमंथन – महाबळेश्वरात

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

२७-२८ ऑगस्ट | महाबळेश्वरात नवा अध्याय

काेल्हापूर – (रुपेश आठवले):
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रकाश अधिक व्यापक करायचा, रिपब्लिकन पक्षाची वाटचाल बदलत्या काळात अधिक मजबूत करायची, आणि कार्यकर्त्यांना साहित्यिक विचारवंतांचे बौद्धिक द्यायचे!” – या ध्येयाने रिपब्लिकन पक्ष येत्या २७ व २८ ऑगस्टला महाबळेश्वरात दोन दिवसीय विचारमंथन शिबिर घेऊन येत आहे.

या शिबिराची माहिती देताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले म्हणाले, “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित व्यापक रिपब्लिकन पक्ष उभा करण्याचा आमचा निर्धार आहे.”

२७ ऑगस्ट रोजी सायं. ५ वा. महाबळेश्वर येथील ऐश्वर्या इन हॉटेलमध्ये शिबिराला सुरुवात होईल. थंड वाऱ्यात, डोंगररांगांत, दोन दिवसांच्या या चिंतनात साहित्यिक आणि विचारवंतांचा मौल्यवान सहभाग असणार आहे.

या शिबिरात डॉ. शरणकुमार लिंबाळे, डॉ. अच्युत माने, डॉ. ऋषिकेश कांबळे, ॲड. दिलीप काकडे, प्रा. विजय काळेबाग, प्रा. अमर कांबळे, प्रा. विजय खरे, प्रा. कुमार अनिल, के.वी. सरवदे, योगीराज वाघमारे, डॉ. संजीवकुमार सोनवणे, रमेश जाधव, विठ्ठल शिंदे, प्रा. प्रशांत मोरे, वैभव कालखैर, विजय साबळे, विजय मोरे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विचारमंथनाचे विषयही थेट समाजाच्या हृदयाला भिडणारे –
दलित बहुजनांचे शैक्षणिक प्रश्न, खाजगीकरण व त्यातील आरक्षण, सहकार चळवळीतून आर्थिक सक्षमीकरण, विविध जाती-धर्म समूहांत रिपब्लिकन पक्षाचा जनाधार वाढविण्याचे धोरण, आणि दलित पँथरसारखी नव्या पिढीची लढाऊ संघटना पुन्हा घडवण्याची आवश्यकता.

या शिबिरात पक्षाची भूमिका, भविष्यातील दिशा आणि संघटनाची मजबुती यावर सखोल चर्चा होणार आहे. दोन दिवस कार्यकर्त्यांना साहित्यिक आणि विचारवंतांचे थेट मार्गदर्शन मिळणार असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले पूर्णवेळ शिबिरात उपस्थित राहणार आहेत.

ही माहिती रिपब्लिकन पक्षाचे प्रा. शहाजी कांबळे आणि संयोजक, रिपाइं चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिली आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.