आज बुलढाणा अर्बनतर्फे पतसंस्थांसाठी विशेष प्रशिक्षण : सहकार क्षेत्राला नवी दिशा
कोल्हापूर :
आशियातील सर्वात मोठी पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. तर्फे आज गारगोटी येथे विविध सहकारी पतसंस्थांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सहकार क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी आणि काळानुरूप अद्ययावत ठेवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे.
या कार्यशाळेत सहकार क्षेत्रातील नव्या नियमांची माहिती, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, ग्राहकांना आकर्षित करण्याचे नवे मार्ग आणि प्रभावी प्रेझेंटेशनची तंत्रे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
पतसंस्था कशा प्रकारे बदलत्या आर्थिक जगाशी जुळवून घेऊ शकतात, ग्राहकांशी विश्वासार्ह संवाद कसा साधावा, पारदर्शक सेवा कशा द्याव्यात आणि आधुनिक व्यवस्थापनाची अंमलबजावणी कशी करावी याबाबत तज्ज्ञ प्रत्यक्ष उदाहरणांसह शिकवणार आहेत.
कार्यक्रम स्थळ : मुनिस पॅलेस, कलानगरवाडी, धर्ती पेट्रोल पंपाजवळ, गारगोटी, कोल्हापूर.
वेळ : सकाळी १०.३० वा.
विभागीय व्यवस्थापक श्रीमती योगिनी पोकळे यांनी सांगितले की,
“आजचा दिवस सहकार क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे. नवे नियम, नवे अपडेट्स आणि नवे तंत्रज्ञान समजून घेऊन त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. पतसंस्था हे समाजाच्या आर्थिक प्रगतीचे केंद्रबिंदू आहेत. या कार्यशाळेतून प्रत्येक संस्थेला ग्राहकांशी नाळ जपण्याचे आणि त्यांचा विश्वास संपादन करण्याचे नवे मार्ग शिकायला मिळतील. सर्व पतसंस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, ही आमची मनापासून अपेक्षा आहे.”
कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या पतसंस्थांना एक प्रकारचे नवे शस्त्रागार मिळणार असून त्याचा उपयोग पुढील कारभार अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी होईल.
बुलढाणा अर्बनने गेल्या ३८ वर्षांत सहकार क्षेत्रात घडवलेले यश हीच या कार्यशाळेची प्रेरणा आहे. पारंपरिक सहकार मूल्ये टिकवत आधुनिक व्यवस्थापनाचा स्वीकार करणे हीच काळाची गरज आहे, आणि हा कार्यक्रम त्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
- या कार्यशाळेत सहकार क्षेत्रातील नवे नियम, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, ग्राहकांशी संवाद व आकर्षण निर्माण करण्याचे मार्ग तसेच प्रभावी प्रेझेंटेशन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
- पतसंस्था कशा प्रकारे बदलत्या आर्थिक जगाशी जुळवून घेऊ शकतात, ग्राहकांचा विश्वास कसा संपादन करू शकतात आणि पारदर्शक सेवा कशा देऊ शकतात याचे प्रत्यक्ष उदाहरणांसह प्रशिक्षण होणार आहे.
“बँकिंगसोबत समाजकारण” सहकारातून समाजसेवा
बुलढाणा अर्बनचे सामाजिक उपक्रम
- सहकार शिल्प मंदिर, हिवरगाव
- बुलढाणा अर्बन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालये (बुलढाणा, औरंगाबाद, अमरावती)
- पुणे येथे शैक्षणिक संकुल व हॉस्पिटल प्रकल्प
- नागपूर येथे श्री साई बुलढाणा अर्बन हॉस्पिटल
- शेगाव रोडवर उद्यान व उपवन प्रकल्प
- श्री क्षेत्र साईबाबा समाधी व गजानन महाराज संस्थान सेवेसाठी योगदान
- हरित बुलढाणा अभियान : १० लाखांहून अधिक झाडे लागवड
- राज्यभर ३०० हून अधिक शाखांद्वारे सामाजिक उपक्रम