पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
रंजित आवळे—चिपळूण
चिपळूण : चिपळूण उपविभागाला आज संध्याकाळपासून अनुभवी, शिस्तप्रिय आणि नागरिकाभिमुख पोलीस अधिकारी लाभणार आहेत. तब्बल 37 वर्षांच्या कारकीर्दीत घडलेले प्रकाश वसंत बेळे (वय 57) आज उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
1 नोव्हेंबर 1988 रोजी मुंबईच्या मरोळ पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून त्यांनी सेवेला सुरुवात केली. 1983 साली वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेत, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर ते पदोन्नतीच्या अनेक टप्प्यांतून पुढे आले.
1994 ते 1996 या काळात भोईवाडा पोलीस ठाण्यात PSI म्हणून काम करताना त्यांनी गुन्हेगारीवर चाप बसवला. त्यानंतर गोरेगाव येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior PI) म्हणून कार्य केले. 2003 मध्ये ट्रॅफिक पोलीस विभागात API पदावर त्यांनी शिस्तीचे धडे दिले. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून दोन वर्षे काम केले. अलीकडे ते ताडदेव येथे सशस्त्र पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते, तेथूनच त्यांची बदली चिपळूणला झाली आहे.
गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण, नागरिकांशी सुसंवाद आणि कायदा-सुव्यवस्थेचा दर्जा उंचावणे — हेच आपले ध्येय असल्याचे प्रकाश बेळे यांनी पदभार स्विकारण्याआधीच स्पष्ट केले आहे.
कुटुंबात पत्नी व विवाहित दोन मुली. सेवाभाव, शिस्त आणि प्रामाणिकपणा — हीच त्यांची खरी ओळख आहे, असे सहकारी सांगतात. आजच्या पदभार सोहळ्यानंतर चिपळूण पोलीस उपविभागात ‘बेळे युग’ सुरू होणार आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.