काेल्हापुरात चालू शकते फक्त हीच कार… ‘आप’ने दाखवले प्रत्यक्षात… काेठे काय घडलं..वाचा सविस्तर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शंभर कोटीच्या रस्त्यावर फक्त डिफेंडरच चालू शकते

निकृष्ट रस्त्यावर आप चे लक्षवेधी आंदोलन

काेल्हापूरः नगररोत्थान योजनेतून शहरात शंभर कोटी रुपयांचे रस्ते करण्याचे काम सुरु आहे. परंतु पहिल्याच पावसात यामधील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहे. रस्त्यांच्या निकृष्ट कामावर आप ने शाहू मैदान येथे डिफेंडर या आलिशान गाडीची प्रतिकृती उभा करून लक्षवेधी आंदोलन केले.

‘शंभर कोटीच्या रस्त्यावर फक्त डिफेंडरच चालू शकते’ असे लिहलेला फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांनी जर शंभर कोटींचा निधी मंजूर करून आणला असेल तर ते काम कसे दर्जेदार होईल हे बघणे देखील त्यांचे काम आहे. ते स्वतः आलिशान गाड्यांमधून फिरतात, त्यामुळे खराब रस्त्यांमुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि सामान्य कोल्हापूरकरांचे होणारे हाल समजत नाहीत अशी टीका आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली.

सुमार दर्जाचे काम होऊनही या ठेकेदाराचे तब्बल 22 कोटी इतके बिल अदा करणारे अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे, शहरातील रस्त्यांचे डांबर खाणारे अधिकारी, ठेकेदार, सल्लागार, सब-ठेकेदार, लोकप्रतिनिधी हेच या निकृष्ट रस्त्यांसाठी कारणीभूत आहेत असेही ते म्हणाले.मुदत उलटून गेली तरी अद्याप ही कामे पूर्ण झालेले नाहीत. या कामाचा दर्जा राखला जावा यासाठी आवश्यक त्या चाचण्या कराव्यात यासाठी आप चा महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता, परंतु महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. हे रस्ते त्याचाच परिणाम असल्याचे आप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

गटर चॅनेलची कामे रस्ता करण्याआधी न करणे, सेन्सर मशीन न वापरणे, जबाबदार अधिकारी साईटवर उपलब्ध नसणे यामुळे रस्त्याचा दर्जा सुमार होत असल्याचा आरोप आप ने केला होता.

या कामासाठी मे. एवरेस्ट कन्स्ट्रक्शन यांची ठेकेदार, तर संदीप गुरव अँड असोसिएट यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. योग्य मटेरियल वापरणे, रस्त्याची मापे घेणे, डिझाईन प्रमाणे काम करून घेणे, दर्जा राखण्यासाठी आवश्यक ते टेस्ट करण्यासाठी समन्वय साधने या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. परंतु त्यामध्ये ही कसूर झाली आहे. यांच्यावर प्रशासक कारवाई करणार का असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतिफ, दुष्यंत माने, उषा वडर, विजय हेगडे, राकेश गायकवाड, संजय नलवडे, उमेश वडर, लखन काझी, रणजित पाटील, स्वप्नील काळे, बबन भालेराव, अमरसिंह दळवी, आदित्य पोवार, प्रकाश हरणे, रमेश कोळी आदी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.