शतकोत्तर रेल्वे महोत्सवाचा कोल्हापुरात भव्य प्रारंभ

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
शतकोत्तर रेल्वे महोत्सवाचा कोल्हापुरात भव्य प्रारंभ
मर्दानी खेळ, चित्रकला, रांगोळी, प्रभातफेरीने उत्सव साजरा
कोल्हापूर:(रुपेश आठवले): भारतीय रेल्वेच्या शतकोत्तर महोत्सवानिमित्त छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्टेशन प्रबंधक आर. के. मेहता यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मध्य रेल्वे, पुणे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अनिल पाठक उपस्थित होते. भारतीय रेल्वेने देशभरात २५ जुलै रोजी शतकोत्तर महोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले होते.
कोल्हापूर स्थानकावर या निमित्ताने मर्दानी खेळ, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांचा लेझीम पथक आणि प्रभातफेरी यांचे आयोजन करण्यात आले. रेल्वे स्थानकाचा ऐतिहासिक प्रवास चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आला.
कार्यक्रमात रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यामध्ये मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, उदयसिंह उर्फ बाबा निंबाळकर, किशोर भोरावत, रेल्वे प्रवासी संस्था मिरजचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे, तसेच मोहन शेटे, सुहास गुरव, अजित कोठारी, सुरेश भोसले, नंदकुमार पाटील (विटा) आणि कोल्हापूर-सांगली रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव अनिल तराळ यांचा समावेश होता.या कार्यक्रमाचे नियोजन मध्य रेल्वे पुणे विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.