शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर कोल्हापूर महापालिकेची कारवाई

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

5 हातगाड्या, 186 स्टँड बोर्डसह सुमारे 250 साहित्य जप्त

कोल्हापूर – शहरातील विविध मुख्य रस्त्यांवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने दोन दिवसात मोठी कारवाई केली. भवानी मंडप ते छत्रपती शिवाजी चौक, सी.पी.आर. ते खानविलकर पेट्रोल पंप, पोलीस अधीक्षक कार्यालय ते कसबा बावडा शुगर मिल, तसेच दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर ते कावळा नाका, मिरजकर तिकटी ते बागल चौक, जनता बाजार, उमा टॉकीज, लक्ष्मीपुरी या प्रमुख मार्गांवर ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत 5 हातगाड्या, 2 केबिन, 186 स्टँड बोर्ड, 22 छत्र्या, 15 वजन काटे, 12 स्टॅच्यू व 12 स्टुल अशी विविध प्रकारची सुमारे 250 हून अधिक अतिक्रमणाची साहित्ये जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई प्रशासक के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त शिल्पा दरेकर व स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, पीएसआय बागल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. प्रत्यक्ष कारवाई अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, सहायक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रविंद्र कांबळे, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, तसेच राजारामपुरी व गांधी मैदान वॉर्डातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पार पाडण्यात आली.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पुढील काळातही अशा अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तसेच दुकानांच्या बाहेर टाकलेल्या शेड्स व साहित्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी स्वतःहून आपल्या दुकानाबाहेरील अतिक्रमण हटवावे. सार्वजनिक रस्त्यांवर, विशेषतः पार्किंग जागांमध्ये स्टँड बोर्ड अथवा इतर वस्तू ठेऊ नयेत. अन्यथा ती साहित्ये जप्त करण्यात येतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.