कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला बनवण्याचा निर्धार
कोल्हापूर (विनायक जितकर) – युवासेना प्रमुख व शिवसेना नेते खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूरातील शिवसेना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शनिवार, दि. २६ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता नागाळा पार्क, खानविलकर चौक येथील शिवसेना संपर्क कार्यालयात होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी शिवसेनेचे मान्यवर नेते खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोकराव माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार जयश्रीताई जाधव यांच्यासह जिल्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असून, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होणार आहे. यामुळे आगामी राजकीय घडामोडींमध्ये या कार्यालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना एकत्र येणार आहेत. कार्यक्रमाच्या तयारीसाठी शिवसेनेचे जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.