जागरूक आई आणि आदर्श वडील हे सुरक्षित व सशक्त समाजाचे आधारस्तंभ – आनंदा शिंदे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

माई चॉईस फाउंडेशन व ग्रामपंचायत वेतवडे यांचे वतीने आयोजित सुरक्षित गाव कार्यक्रम

पन्हाळा – जिवंत राहण्यासाठी जसं पाणी महत्त्वाच आहे तसंच जागरूक आई व आदर्श वडील जीवनाचा स्त्रोत आहे. ते खंबीर आणि जागरूक असतील तर कुटुंबातील पुढील पिढी निर्भय, व्यसनमुक्त आणि हिंसाचार मुक्त असेल असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते आनंदा शिंदे राशिवडेकर यांनी विद्या मंदीर वेतवडे तालुका पन्हाळा येथे राशिवडे कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळ, माई चॉईस फाउंडेशन व ग्रामपंचायत वेतवडे यांचे वतीने आयोजित सुरक्षित गाव कार्यक्रमात बोलताना केले. अध्यक्षस्थानी सरपंच रेखा पवार होत्या.

यावेळी बोलताना आनंदा शिंदे म्हणाले, गावातील प्रत्येक घर हे सुरक्षितच असलं पाहिजे ते तेव्हा सुरक्षित होईल जेव्हा त्या घरातील आईबाप हे जागरूक असतील. सोशल मीडिया व टीव्हीच्या अतिवापरामुळे घरातील संवाद हरवला आहे तो बळकट करण्यासाठी बापाने आदर्श शेतकऱ्याची भूमिका वटवली पाहिजे. तरच घर सुरक्षित राहील व गावही सुरक्षित राहील असे ते म्हणाले. पोलीस व रेड अलर्ट हेल्पलाइन नंबर, महिला व चाईल्ड लाईन हेल्प लाईन नंबर याची माहिती देऊन ते विद्यार्थ्यांच्या कडून पाठ करून घेतले व अडचणीच्या वेळी इथे संपर्क करून मदत घेण्याचे आवाहन त्यांनी केले. बालविवाह, बाल तस्करी, मानव तस्करी, बालमजुरी, बाल लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार, हुंडा प्रतिबंध याविषयी माहिती देऊन जनजागृती केली. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला व महिलांना एका सुरक्षित गावाचा प्रकाश ही पुस्तिका मोफत वितरित केली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सुचित्रा कुंभार, मुख्याध्यापक उर्मिला तेली, माजी उपसरपंच शिवाजी पाटील, डॉ दिलीप माने, सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार, अंगणवाडी सेविका संगीता कांबळे, संपदा वीर, अशा स्वयंसेविका रेखा सुतार ,शुभांगी वीर, गटप्रवर्तक शितल कांबळे, उपस्थित होते.

स्वागत प्रास्ताविक स्वप्नाली कलकुटकी सूत्रसंचालन अक्षय पाटील आभार दिलीप पाटील सर यांनी मानले. दरम्यान विद्या मंदिर व संजय गांधी विद्यालय पनुत्रे तालुका पन्हाळा येथेही सुरक्षित गाव कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना एका सुरक्षित गावाचा प्रकाश ही पुस्तिका वाटप करण्यात आली व सर्व विद्यार्थ्यांच्याकडून हेल्पलाइन नंबर पाठ करून घेण्यात आले. यावेळी सरपंच छाया कांबळे, उपसरपंच सरदार पाटील, पोलीस पाटील कल्पना पाटील, मुख्याध्यापक एस पी पाटील, दीपक घुले, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कांबळे गटप्रवर्तक पूनम पाटील, अंगणवाडी सेविका माया गुरव, महेश पाटील, अशा स्वयंसेविका अश्विनी पाटील उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.