कोल्हापूर : वाहतूक सल्लागार समितीची बैठक – वाहतूक शिस्तीवर भर, उपाययोजना ठरल्या
कोल्हापूर : शहरातील वाढती वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, शाळा व कार्यालयांची गर्दी यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा वाहतूक सल्लागार समितीची महत्त्वाची बैठक पार पडली.पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत वाहतूक कोंडी, अतिक्रमण, शाळा परिसरातील विद्यार्थी वाहतूक, पार्किंगच्या सोयी यासारख्या मुद्द्यांवर खुलेपणाने चर्चा झाली. त्यामुळे येत्या काही दिवसात आता शहर, उपनगर परिसरात पाेलीस व सामाजिक कार्यकर्ते कशापद्धतीने शिस्त लावणार व ती पाळली कशी जाणार याकडे आता भविष्यात लक्ष लागून राहिले आहे.
महत्त्वाचे मुद्दे आणि उपाय योजना –
✅ वाहन पार्किंगची सोय : खाजगी ट्रॅव्हल्स बसेस व शाळेच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव.
✅ नो हॉकर्स झोन : सिग्नल चौक आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर नो हॉकर्स झोन जाहीर करून अतिक्रमण हटवले जाणार.
✅ यू-टर्नचे नियोजन : वाहनांची अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी यू-टर्नची जागा आणि चौक यांचे योग्य नियोजन केले जाणार आहे.
✅ सिग्नल व सीसीटीव्ही कार्यान्वित : शहरातील सिग्नल चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिग्नल यंत्रणा नियमितपणे कार्यरत ठेवली जाणार.
✅ शाळा वाहतूक सुरक्षितता : विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी शाळांच्या आवारातच स्कूल बस आणि व्हॅन पार्किंगची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव.
✅ रस्ते आणि बस स्टॉप पुनर्रचना : वापरात नसलेल्या बस स्टॉप केबिनमुळे निर्माण होणारा अडथळा दूर करण्याचा निर्णय.
✅ ट्रक टर्मिनस व शटल सेवा सुरू : मोठ्या वाहनांच्या पार्किंगसाठी ट्रक टर्मिनस आणि शटल सेवा सुरु करण्यावर भर.
✅ दुकान बाहेरील बोर्ड व पायाड हटवणार : दुकानदारांनी रस्त्यावर ठेवलेल्या पायाड व फलकांमुळे पार्किंगला अडथळा होत असल्याने कारवाईचा इशारा.
- विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहरातील ट्रॅफिकचे प्रश्न उपस्थित केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने महालक्ष्मी मंदिर जवळ पार्किंगचा प्रश्न तसेच सर्व रोडवरील साईड पट्टे मारणे. तसेच रिक्षा चालकांकडून होणारी जादा भाडे आकारणी तसेच बाईचा पुतळा ते गोखले कॉलेज रॊड मध्ये फोर व्हिलर बाजार मुळे होणारी वाहतूक कोंडी हा प्रश्न मांडण्यात आला.
- शहर वाहतूक नियंत्रक कक्षाचे नंदकुमार मोरे साहेबांनी पुढील 3 महिन्याचा वाहतूक प्लॅन कशा पद्धतीने योग्य होईल याचा सर्वांकडून सूचना घेतल्या. विविध समस्याचे निराकरण करण्याचा प्लॅन कारण्यात आला.
- लॉरी असोशियशनने आपल्या समस्या मांडल्या. प्रत्येक 3 महिन्यांनी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले. मिटिंगला सर्व पोलीस निरीक्षक तसेच ट्रॅफिकचे अधिकारी आ. टी. ओ. चे अधिकारी तसेच महा पालिकेचे अधिकारी, एस. टी. चे तसेच केएमटी चे अधिकारी, व्यापारी संघटना, वाहतूक संघटना उपस्थित होत्या.
बैठकीत पोलीस, महापालिका अधिकारी, व्यापारी संघटना, ट्रॅफिक सल्लागार, विविध सामाजिक संघटना आणि व्यावसायिक प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी वाहतूक शिस्त, नियमांचे काटेकोर पालन आणि नागरिकांच्या सहकार्याची गरज यावर भर दिला.पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी नागरिकांनी पुढाकार घेऊन नियमांचे पालन करावे, तसेच वाहतूक समस्या दूर करण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजनांना पाठबळ द्यावे, असे आवाहन केले.
कोल्हापूरकरांनो, वाहनांची शिस्त पाळा, जागरूक नागरिक व्हा-POSITIVEWATCH