देशातील ब्रिटिशधार्जीन प्रवृत्तीची सरकारे दूर करण्यासाठी स्व. माधवराव माने यांच्यासारखे क्रांतिकारक तयार होणे गरजेचे – प्रवक्ते संतोष पाटील

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

देशातील ब्रिटिशधार्जीन प्रवृत्तीची सरकारे दूर करण्यासाठी स्व. माधवराव माने यांच्यासारखे क्रांतिकारक तयार होणे गरजेचे – प्रवक्ते संतोष पाटील

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व. माधवराव माने उर्फ आप्पा यांची १०३ वी जयंती लक्ष्मीनगर, कुपवाड येथे त्यांचे चिरंजीव अनिल माने यांच्या नियोजनाखाली विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचे उत्तराधिकारी  हनुमंतराव राडे यांच्या हस्ते स्व. माधवराव माने यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर प्रवक्ते संतोष पाटील यांच्या हस्ते नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायन्स क्लबतर्फे डॉ. रोहित सातपुते आणि त्यांच्या पथकाने १२५ गरजू रुग्णांची डोळे तपासणी करून मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मोतीबिंदू झालेल्या रुग्णांचे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.

याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्व. माधवराव माने आप्पा यांच्या १९४२ च्या चळवळीतल्या कार्याचा उजाळा देत पुढील पिढीला ते नेहमीच प्रेरणा देतील, असे मत व्यक्त केले.

संतोष पाटील म्हणाले, “देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे उलटून गेली, तरीसुद्धा खरी व्यक्तिगत स्वातंत्र्याची जाणीव सामान्य जनतेला झालेली नाही. सत्ताधारी आजही ब्रिटिशांच्या शासनपद्धतीची नक्कल करत असल्यासारखे वागत आहेत. जाती-धर्मांत फूट पाडून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने आप्पा यांनी इंग्रजांविरुद्ध ज्या प्रकारे क्रांती केली, त्याच धर्तीवर सध्याच्या राज्यकर्त्यांविरुद्ध नव्या तरुण क्रांतिकारकांनी ‘चले जाव’चा नारा देऊन अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा अशी वेळ आली आहे.”

तसेच ते म्हणाले, “ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने आप्पा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्या आदर्शावर तरुणांनी समाजकार्य करावे, हेच त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल.”

कार्यक्रमाला  एडवोकेट अजितराव सूर्यवंशी, नगरसेवक राजेंद्र कुंभार, प्रा. नंदकुमार सुर्वे, हसन देसाई, डॉ. जयपाल चौगुले, वसंतराव नवले, योगेश देसाई, मोहनराव देशमुख, रघुनाथ नार्वेकर, विलासराव साळुंखे, रामचंद्र पवार, जयसिंग सावंत, संमती गोदाजी सर, सदाशिव मगदूम, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजितराव ढोले, दशरथ ढोले, अशोकराव कोकिळेकर, शामराव माने, वी. आर. पाटील, दत्तात्रय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

सर्वांनी स्व. माधवराव माने आप्पा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.