पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघ श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघ च्या शिष्ट मंडळाने व संत नामदेव महाराजांचे वंशज यांनी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंढरपूर येथे भेट घेतली. त्यांना 23 व 24 जुलै रोजी होणाऱ्या संत नामदेव महाराजांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. श्री.संत नामदेव क्षत्रिय एकसंघ च्या वतीने संस्थापक अध्यक्ष महेश ढवळे, संस्थापक सचिव रुपेश खांडके, एकसंघाचे प्रदेशाध्यक्ष गणेश उंडाळे, तर संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज ह.भ.प ज्ञानेश्वर नामदास महाराज व निवृत्ती नामदास महाराज, भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले उपस्थित होते. मुख्यमंत्री महोदयांनी हे निमंत्रण स्वीकारत संजीवन समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्याविषयी आश्वासित केले.
– नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.