CRIME: गुन्हेगार दिसला.. करा काँल! शाहुपूरी पाेलीस अँक्शन माेडवर… अट्टल टाेळी, गुंडांना केले हद्दपार!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कावळा नाका परिसरातील. गुन्हेगारी टोळीला जिल्ह्यातून हद्दपार!

कोल्हापूर शहरातील कावळा नाका परिसरात गेल्या काही काळात दहशत माजवणाऱ्या कुख्यात संघटित गुन्हेगारी टोळीवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी मोठी कारवाई करत टोळीप्रमुख साजन अशोक कुचकोरवीसह एकूण १७ जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संताेष डाेके यांनी  महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ नुसार या टोळीविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या  प्रकरणाची चौकशी इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली होती. चौकशी अहवालात टोळीच्या गुन्हेगारी कारवाया परिसरातील सामाजिक स्वास्थ्य व नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका ठरल्याचे स्पष्ट झाले.

ही बातमी देखिल अधिक वाचली गेली. तुम्ही वाचला नसाल तर वाचा.. आताच.. POSITIVEWATCH

CRIME शाहुपुरी पोलिसांची दमदार कामगिरी:पकडली बनावट आरसीबुक टोळीची गुन्हेगारी : तीन गाड्या व साहित्य जप्त

या टाेळीतील टोळीप्रमुख साजन अशोक कुचकोरवीसह बालाजी कुंचिकोरवी, देवा उर्फ देवेंद्र जोंधळे, विशाल जगदाळे, अशिष पवार, रोहित जोंधळे, संग्राम पवार, करण कुंचिकोरवी, युवराज चौगले, सुमित माकडवाले, सिद्धार्थ कुचकोरवी, आलोक कुचकोरवी, दिपक माने यांच्यासह १७ जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकाऱ्यांनी पारित केले. काही टोळी सदस्यांना आदेशाची बजावणी पूर्ण झाली असून उर्वरितांवर कारवाई सुरू आहे. या टोळीमुळे परिसरातील नागरीकांमध्ये दहशत व सामाजिक अस्वस्थता वाढत होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक  योगेश कुमार गुप्ता  यांनी सांगितले. हद्दपार केलेले व्यक्ती जिल्ह्यात दिसून आल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ वर संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असेही आवाहन करण्यात आले आहे. शाहुपूरी पाेलिसांच्या या कारवाईमुळे शाहुपूरी हद्दीतील  नागरिकांसह अनेकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. यावेळी नागरिकांमध्ये पाेलीस ठाण्यातील  संघटीत टाेळीलाही आळा बसविण्यासाठी त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई तसेच त्यांच्या समाजात खुलेआम मिरवणूक काढून, ही दहशत ठेचून काढावी, असा चर्चेचा सुरू आहे. 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.