युवासंत नितीनभाऊ मोरे यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची भेट..!
गुरुपीठ भेटीचे मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले आमंत्रण..
मथुरा /नाशिक (प्रतिनिधी): अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक, युवासंत, गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांनी मथुरा येथे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची नुकतीच भेट घेतली.
गुरुपुत्र श्री मोरे यांनी मथुरा येथे सुरू असलेल्या भागवत सप्ताहाची आणि सेवामार्गाच्या कार्याची माहिती मुख्यमंत्री गुप्ता यांना दिली आणि गुरुपीठात दर्शनासाठी येण्याचे आमंत्रण दिले. मुख्यमंत्री गुप्ता यांनी आमंत्रण स्वीकारले असून आपण लवकरच गुरुपीठात दर्शनासाठी येऊ असे वचन दिले. सोबतच गुरुपुत्र श्री मोरे यांनी सेवामार्गाचे काही ग्रंथही मुख्यमंत्र्यांना दिले.