माजी उपसभापती अरुण जाधव तळाशीकर यांची कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या तज्ज्ञ सदस्यपदी निवड

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

अरुण जाधव यांची कामाची तळमळ, शेतकऱ्यांप्रती असलेली आपुलकी आणि प्रशासकीय सुसंवादामुळे निवड

कोल्हापूर (विनायक जितकर) – कोल्हापूर जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागात अत्यंत महत्त्वाचे योगदान देणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत नेहमीच आग्रही भूमिका घेणारे अरुण जाधव तळाशीकर यांची नुकतीच कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या तज्ज्ञ सदस्य (Expert Member) म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्हा इरिगेशन फेडरेशन ही संस्था सिंचन प्रकल्पांच्या नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असते. अशा संस्थेत अरुण जाधव यांना स्थान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या प्रसंगी बोलताना जाधव म्हणाले कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या तज्ज्ञ सदस्यपदी निवड झाल्याचा मला अत्यंत अभिमान आहे. आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या मार्गदर्शना खाली ही जबाबदारी मला मिळाली, हे माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. मी नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करत आलो आहे आणि यापुढेही त्या कार्याला अधिक जोमाने चालना देईन. शेतकऱ्यांचे सिंचनाशी संबंधित प्रश्न, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, आणि शासनाच्या योजना शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

सदर निवडीबद्दल शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. यावेळी प्रशांत जाधव, शरद मगर, दत्तात्रय उगले, शिवाजी चौगले, कुंडलिक पाटील, राहुल पाटील यांच्यासह स्थानिक पातळीवरील विविध पदाधिकारी व समर्थकांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. अरुण जाधव यांची कामाची तळमळ, शेतकऱ्यांप्रती असलेली आपुलकी आणि प्रशासकीय सुसंवादामुळे त्यांची ही निवड लक्षणीय ठरते.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.