खराब रस्त्यांकडे वेधले लक्ष
डांबरीकरणाच्या रोलर व बॉयलरवरून लग्नाची अनोखी वरात
=प्रिन्स क्लब खासबागचा उपक्रम
———————————-
कोल्हापूर -मंगळवार पेठ खासबाग परिसरातील पुणे येथे आयटी कंपनीमध्ये नोकरी करणारा प्रिन्स क्लब चा कार्यकर्ता चि.संकेत जोशी व चि. सौ कां .सोनाली नायक हे आज कोल्हापुर येथे विवाहबद्ध झाले. मंडळाच्या प्रथेप्रमाणे आज कोल्हापुरातील रस्त्यांची झालेली दुर्देशा यावर लक्ष वेधण्यासाठी नवदांपत्याची डांबरीकरणाचा रोलर व बॉयलर वर बसून पारंपारिक लेझीम हलगी घुमके आणि सनईच्या तालावर अनोखी वरात काढण्यात आली. महाव्दार रोड , बिनखांबीगणेश मंदिर मिरजकर तिकटीमार्गे खासबागेपर्यंत निघालेली ही अनोखी वरात नागरिकांचे लक्ष वेधून चर्चेचा विषय ठरली.
*कोल्हापूर शहरामध्ये एकही रस्ता धड नाही. विकासाचे व्हिजन* नाही , *राजर्षि शाहू* महाराजांच्या पुण्याइवर शासनाकडून अतिशय तोकडा निधी येतो. त्यातही *अधिकारी ,लोकप्रतिनिधी टक्केवारी* मिळविण्यासाठी निकृष्ट दर्जाची अनावश्यक विकास कामे शहराच्या माथी मारतात. त्यामुळे मोठमोठे उद्योग धंदे आयटी पार्क येथे प्रगत झालेला नाही. त्यामुळे युवकांना रोजगारासाठी पुणे ,बेंगलोर सह परदेशात नोकरी शोधावी लागते. याची नवरदेव व मित्रमंडळींना खंत आहे.
https://youtu.be/VESW5RZ6b4Q?si=pvayDBIFBwvXtjka
VIDEO पहा 👆✌️
कोल्हापूरच्या रस्त्यांची ही र्दुदर्शा पाहून लग्नाच्या वरातीसाठी सासरवाडी कडून डांबरीकरणाचा रोलर व बॉयलरही स्पेशल भेट मिळाली. म्हणून त्यावरून मंडळाच्या वतीने लग्नाची अनोखी वरात काढण्यात आली.
या वरातीचे संयोजन सचिन साबळे ,अभिजीत पोवार , नामदेव माळी , संदीप पोवार , विशाल कोळेकर , विराज जगताप ,बंडू हावळ , रमेश मोरे , अशोक पोवार , आदीकार्यकर्त्यांनी केले .