भौतिकशास्त्रात करीयरच्या अनेक वाटा: अल्विन क्रीस्टी

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

नाशिक: भौतिकशास्त्रात करीयरच्या अनेक संधी आहेत. विश्वाचा पसारा समजून घेण्याचा आनंददायी अभ्यास म्हणजे भौतिकशास्त्र होय. शिक्षणक्षेत्राबरोबरच पदवीत्तर पदवीनंतर इस्रो, डिआरडीओ, बार्क, आयएमडी, आयजीसीएआर, एव्हिएशेन, स्पेस अशा विविध तांत्रिक क्षेत्रात व संशोधनात देखील करीयर वाटा आहेत. पदवी नंतर पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशीप किंवा फेलोशिपच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देखील मिळते.

प्रॉब्लेम सॉल्विंग, एनेलिटिकल थिंकींग, डेटा एनेलेटिक्स, प्रोग्रामिंग, टिम वर्क अॅबिलिटी, कम्युनिकेशन स्किल्स आदी इतर क्षेत्रात लागणारे कौशल्य हे भौतिकशास्त्रात करीयर करणाऱ्या विद्यार्थांच्या अंगी देखील लागते. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी विद्यार्थांनी पीयर रिव्हू जर्नल मध्ये रिसर्च पेपर प्रकाशित करावेत आणि प्राध्यापकांनी त्यांना मार्गदर्शन करावे असे प्रतिपादन केरळच्या ग्रामीण भागातून पारंपारीक पद्धतीने शिक्षण घेत भौतिकशास्त्राची पदवी घेऊन टीआयएफआर संस्थेत पदवीत्तर पदवीसाठी पोहचलेला एक विद्यार्थी अल्विन क्रीस्टी यांनी केले. गेट, नेट, सेट, जॅम व इतर स्पर्धा परीक्षेंची तयारी कशी करावी याबाबत देखील माहिती देत मविप्र क.का. वाघ महाविद्यालयात “भौतिकशास्त्रातून करीयर वाटा” या विषयावर विद्यार्थांना त्यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

प्राचार्य, डाँ. ज्ञानाेबा ढगे

विश्व समजून घेतांना भौतिकशास्त्र महत्वाचे: प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र क. का वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे हे होते. कणाद आणि गॅलिलियो पासून जगाच्या इतिहासात भौतिकशास्त्रज्ञांची फार मोठी परंपरा आहे. विश्व समजून घेतांना भौतिकशास्त्र महत्वाचे आहे असे ते म्हणाले.

प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एन. यु. पाटील यांनी केले आणि भौतिकशास्त्राचे महत्व त्यांनी समजावून सांगितले. आभार डॉ. अनिल तिदार यांनी मानले.यावेळी प्रा. अमोल वाकडे, प्रा. विलास जाधव, प्रा. तुषार मोरे, प्रा. मंगेश जमदाडे, प्रा. आकाश गायकवाड, प्रा. प्रियांका तांदळे आयूक्यूएसी कोऑर्डिनेटर व इलेक्ट्रॉनिक्स सायन्स विभागप्रमुख प्रा. भगवान कडलग, प्रा. किरणकुमार जोहरे आदी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते

 

 

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.