डॉ. विनोद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय डेंगू दिवस सीपीआर आवारामध्ये सादर…
कोल्हापूर – राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर ( मेडिकल कॉलेज ) चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शिशिर मिरगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय डेंगू दिवस सीपीआर आवारामध्ये सादर करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनी डास अळी नियंत्रण करणे हेच डेंग्यू रोखण्याचे प्रभावी शस्त्र आहे. याकरिता लोकसहभाग फार महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन केले. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे म्हणाले डेंगू बद्दल नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या घर व परिसरातील, कार्यालयातील सर्व पाणीसाठे आठवड्यातून एकदा घासून पुसून कोरडे केल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही. तसेच डेंगू चा उपचार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहे.
सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी जे के कांबळे साहेब म्हणाले पावसाळ्यापूर्वी सर्व नागरिकांनी आपल्या घर परिसरातील व कार्यालयातील आडगळ येथील भंगार साहित्य उदाहरणार्थ माठ, टायर्स, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकचे भंगार साहित्य, पत्र्याचे भंगार डबे इत्यादी पाणी साठून राहील अशा प्रकारचे सर्व साहित्य यांची योग्य विल्हेवाट लावावी. हिवताप कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष बाजीराव कांबळे यांनी राष्ट्रीय डेंगू दिनाचे महत्त्व सांगून उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली व प्रास्ताविक केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे व प्रमुख पाहुणे यांचे हस्ते गप्पी मासे सोडण्यात आले तसेच डास अळी व डास यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जहीर पटवेगार, जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक श्री शिवाजीराव चिखले, आरोग्य निरीक्षक पी एस पवार, अमृत हरी सुतार कीटक समहार श्री एस एन पाटील, शंकर कुंभार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती वंदना दाते श्रीमती स्मिता गायकवाड, प्रशांत शेळके, आरोग्य सेवक जावेद मुल्ला व राहुल डोंगळे, व सीपीआरकडील स्टाफ उपस्थित होता. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन कांबळे यांनी सर्वांच्या आभार मानले.
















































