अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळ मुख्य अभियंता परेश भागवत यांच्या हस्ते सत्कार…
कोल्हापूर परिमंडळ – जबलपूर मध्यप्रदेश येथे ११ ते १३ मार्च दरम्यान मध्यप्रदेश पॉवर मॅनेजमेंट कंपनी लि. च्या मार्फत संपन्न अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या स्पर्धेत अमित पाटील यांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. त्याबद्दल मुख्य अभियंता परेश भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) शशिकांत पाटील, कार्यकारी अभियंता (प्रशासन) अभिजीत सिकनीस, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जबलपूर येथे देशभरातील विद्युत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित क्रीडा स्पर्धात शरीरसौष्ठव टॉल क्लास (१६७ ते १७२ सेंटीमीटर) गटात सहभागी होऊन अमित पाटील यांनी कांस्यपदकाची कमाई केली. ते महावितरणच्या फुलेवाडी उपविभागात बालिंगा ग्रामीण शाखेत वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत. गेल्या १० वर्षांपासून ते शरीरसौष्ठवासाठी परिश्रम घेत आहेत. भालाफेकीचेही कौशल्य त्यांना अवगत आहे. महावितरणच्या आंतरपरिमंडळीय स्पर्धेत त्यांनी भालाफेकीत सुवर्णपदक मिळविले होते.