खूनाचा प्रकार घडला, त्याने mb ला केला , पोलीस दाखल झाले: पुढे वाचा सविस्तर

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

सोनारावर धारधार शस्त्राने वार… उसने दिलेल्या पैशाच्या वादातून धारदार शस्त्राने सोनाराचा खून…

चंदगड – उसने दिलेले पैसे परत केले नाही म्हणून केला खून. रागातून घडले हे कृत्य. या घटनेत चंदगड येथील बाळकृष्ण अनंत सोनार (सध्या रा. तुडये, मूळ गाव कालकुंद्री जि. कोल्हापूर वय ६०) यांची धारदार विळ्याने सपासप वार करून हत्या करण्यात आलेली आहे. संशयित आरोपी रमेश बाबू पाटील (रा. तुडये ता. चंदगड) याला चंदगड पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

बाळकृष्ण सोनार हे सोने चांदीचे खरेदी, विक्रीचे व्यापारी आहेत. गावागावात फिरून ते सोने चांदीची विक्री करतात. व्यवसायाच्या भांडवलाकरिता रमेश बाबू पाटील याने बाळकृष्ण सोनार यांना काही दिवसांपूर्वी १ लाख ३० हजार रुपये उसने दिले होते. अनेक वेळा पैशासाठी तगादा लावूनही सोनार याने पैसे परत दिले नाहीत. याचाच राग मनात धरला गेला आणि त्याचा बदला घेतला गेला.

दरम्यान, आज मंगळवारी दुपारी १ वाजता धामणे – कर्नाटक हद्दीतून स्वप्नवेल पॉईंटकडे जाणाऱ्या डोंगरात मोटरसायकल वरून रमेश याने बाळकृष्णला नेले. व मध्यस्थामार्फत आपला प्रश्न सोडवूया असे खोटे बोलून त्याला स्वप्नवेल पॉईंट कडे नेले. त्यानंतर घनदाट जंगलात त्याच्यावर विळ्याने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये बाळकृष्ण गंभीर जखमी अवस्थेत पडले. घाबरलेल्या रमेशने घराकडे पलायन केले. जखमी अवस्थेत असलेल्या बाळकृष्ण यांनी आपल्या मोबाईलवरून चंदगड पोलिसांना ही माहिती दिली. आपण कुठे आहोत याची माहिती दिल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी आणि दुसरे पथक रमेश याला पकडण्यासाठी तुडये येथे दाखल झाले. रक्ताने माखलेले कपडे धुत असताना रमेश याला पोलिसांनी अटक केली.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.