हॉटेल कामगार, टेलर नाभिक बांधव यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्यासाठी बैठक घेणार- प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कामगार मंत्री सुरेश खाडे यांचेसमवेत 28 फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन…

गारगोटी – राज्यातील हॉटेल कामगार, टेलर व्यावसायीक व नाभिक बांधवांकरीता स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्यासाठी बुधवार 28 फेब्रुवारी रोजी कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांचेसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी असंघटीत कामगार कल्याण महामंडळ आणि त्याच्या अंतर्गत व्यवसाय, उद्योग क्षेत्रनिहाय 39 आभासी मंडळे स्थापन करण्याबाबतचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या 39 आभासी मंडळांमध्ये हॉटेल कामगार, टेलर व्यावसायीक व नाभिक बांधवांच्या महामंडळाचा समावेश आहे. सदर महामंडळांच्या कामाना प्रत्यक्ष सुरवात करून हॉटेल कामगांर, टेलर व्यावसायीक व नाभिक बांधवांना या महामंडळाचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व कामगारमंत्री सुरेश खाडे यांचेकडे पाठपुरावा सुरू होता.

परंतू याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. यामुळे 28 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय टेलर दिनाचे औचित्य साधून टेलर महामंडळ व हॉटेल कामगार व नाभिक महामंडळाचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करणेसाठी बैठकीचे आयोजन करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.