केंबळीतील शांताबाई सुखावल्या… घर प्रकाशले अन् डोळे पाणावले…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सामाजिक बांधिलकीपोटी वीज कर्मचारी दोन पाऊल पुढे सरसावले…

कोल्हापूर – कागल तालुक्यातील केंबळी गावातील आजी शांताबाई यांच्या घरात पहिल्यांदाच वीज आली. वर्षानुवर्षे अंधारात चाचपडणाऱ्या शांताबाईंचें घर प्रकाशले अन् त्यांचे डोळे आनंदाने पाणावले.

आपल्या दोन मतिमंद मुलांसह शांताबाई संभाजी पाटील या केंबळी गावात राहतात. त्यांच्या घरी वीज नाही, ही बाब समजल्यानंतर सामाजिक बांधिलकीपोटी वीज कर्मचारी दोन पाऊल पुढे सरसावले. महावितरण बाचणी शाखा अभियंता पृथ्वीराज घोडके व वरिष्ठ तंत्रज्ञ दिगंबर चांदेकर यांनी खर्चाची जबाबदारी उचलली. ग्रामपंचायतीशी संपर्क साधून तातडीने कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. अन् एका दिवसात शांताबाईंना वीज जोडणी सुविधा मिळाली.

कोल्हापूर ग्रामीण विभाग १ चे कार्यकारी अभियंता दीपक पाटील, उपकार्यकारी अभियंता रत्नाकर मोहिते यांनी कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. इस्पूर्ली शाखा अभियंता सुभाष पाटील ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ यशवंत पाटील, उत्तम कांबळे, प्रवीण पाटील, विश्वनाथ पाटील, मोला सय्यद यांनी वीज कर्मचाऱ्याना कौतुकाची थाप दिली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.