राधानगरी विधानसभा मतदार संघातील 150 शेतकऱ्यांसाठी आंतरराज्य अभ्यास दौरा – प्रा.अर्जुन आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

3500 शेतकऱ्यांकरीता आंतरराज्य अभ्यास दौरा करण्याचा मानस…

गारगोटी प्रतिनिधी – शेतकऱ्यांना राज्याबाहेर सुरु असणारे कृषी विषयक नव-नविन तंत्रज्ञान, संशोधन याबाबतची माहिती मिळावी व शेतकरी यांनी आपल्या शेतात या संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, शेतकरी सक्षम बनावेत आणि तंत्रज्ञान प्रसारामध्ये त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून व कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचे माध्यमातून राधानगरी विधानसभा मतदार संघातील 150 शेतकऱ्यांना राज्याबाहेर शेतकरी अभ्यास दौरा आयोजित केला असल्याचे के.डी.सी.बँकचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी सांगितले. ते गारगोटी येथे शेतकरी दौरा प्रसंगी गाडी पुजन कार्यक्रमा वेळी बोलत होते.

यावेळी बोलताना राहूरी कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय उगले म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांयना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांकरीता या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना ऊस शेती, फळबाग लागवड, सेंद्रीय शेती, रेशीम उद्योग याबद्दल नवीन संशोधनाची शास्रशुद्ध माहिती मिळणार आहे. या अभ्यास दौऱ्यामध्ये ऊस संशोधन केंद्र कोईमतूर (कर्नाटक), काजू अनुसंधान निदेशालय पत्तूर (कर्नाटक), सेंद्रीय शेती संशोधन केंद्र, म्हैसूर (कर्नाटक), भारतीय फळ पिके संशोधन केंद्र, बेंगलोर (कर्नाटक), चहाचे मळे व कारखाना, ऊटी (तमिळनाडू) या ठिकाणी भेट देण्यात येणार आहे.

3500 शेतकऱ्यांकरीता आंतरराज्य अभ्यास दौरा करण्याचा मानस आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून राधानगरी विधानसभा मतदार संघातील शेतकरी बांधवांकरीता आयोजित करण्यात आलेला हा आंतरराज्य शेतकरी अभ्यास दौरा कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलाच आहे असून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील 3500 शेतकऱ्यांना यापध्दतीने अभ्यास दौरा आयोजित करण्याचा आमदार प्रकाश आबिटकर यांचा मानस असल्याचे प्रा.अर्जुन आबिटकर म्हणाले.

शेतकरी अभ्यास दौऱ्याचा शुभारंभ करताना प्रा.अर्जुन आबिटकर, यावेळी गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, राज्य आत्मा समितीचे सदस्य अशोकराव फराकटे, बाजार समितीचे माजी संचालक कल्याणराव निकम, मौनी विद्यापीठाचे शासन नियुक्त प्रतिनिधी बाजीराव चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य जयवंतराव चोरगे, तालुका कृषी अधिकारी किरण पाटील, गारगोटी उपसरपंच सागर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत भोई, भरत शेटके, दिपक देसाई, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश सुतार, रणधिर शिंदे, राजेंद्र चिले, अजित चौगले, सचिन पिसे, जितेंद्र भोसले, यांच्यासह प्रमुख मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.