हद्दवाढ का आवश्यक… देखाव्यातून असेही प्रबाेधन!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी हद्दवाढ का आवश्यक आहे
… याबाबत ‘स्मॅक’ चे सदस्य मे. देवजी इंडस्ट्रीजचे अनुप – अतुल आनंदराव पाटील कुटुंबीयांनी त्यांच्या घरगुती गणेशोत्सवातील देखाव्यातून समाजासमोर एक प्रभावी आणि प्रेरणादायी संदेश सादर केला आहे.

कै. आनंदराव पाटील कुटुंबीयांची प्रामाणिक इच्छा :
” लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी कोल्हापूर हद्दवाढीचा निर्णय तातडीने मार्गी लावावा, जेणेकरून आपले कोल्हापूर अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रगतिशील होईल. “

क्रीडाई, कॉन्ट्रॅक्टर, इंजिनीअर आणि इतर सर्व संलग्न असोसिएशन यांच्या एकत्रित प्रयत्नांतून कोल्हापूरला सुंदर, सुसंस्कृत [ Well-Cultured ] आणि सुव्यवस्थित [ Well-Developed ] शहर बनवणे सहज शक्य आहे.

️… हा देखावा केवळ समस्याच मांडत नाही तर उपायांचा मार्गही दाखवतो.

* हा प्रभावी व्हिडिओ जरूर पहा आणि समाजात कोल्हापूरच्या प्रगतीचा नवा आराखडा पोहोचवण्यासाठी इतरांनाही शेअर करा !

*POSITIVEWATCH* कोल्हापूर

या देखाव्यात …नेमकं काय आहे.

* कोल्हापूरमधील सर्व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडवले असून, शहराच्या आजच्या समस्याही प्रभावीपणे मांडल्या आहेत.

* सध्या शहरात अरुंद रस्ते, पार्किंगची कमतरता, ट्रॅफिक नियोजन, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्यविषयक समस्या जाणवतात.

* कामानिमित्त बाहेरगावी हुबळी, बेळगाव, बेंगळुरू, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रगत शहरांमध्ये जाऊन त्यांनी तेथील पायाभूत सुविधा, मल्टी-स्टोरी इमारती, मॉल्स पाहिल्यानंतर, कोल्हापूरलाही या सोयी-सुविधा मिळाव्यात असे मत त्यांनी मांडले आहे.

* शहराच्या हद्दवाढीसाठी प्रस्तावित जी ७/८ गावांचा समावेश करणे गरजेचे असल्याचे या देखाव्यातून स्पष्ट केले आहे.

▪️ हद्दवाढीनंतर कोल्हापूर शहर कसे असावे याचा आराखडा …
* छोट्या-मोठ्या मल्टी-स्टोरी बिल्डिंग्ज, बांधकामाच्या कट-आउट्स आणि विकास आराखड्यांच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे.

-जितेंद्र बामणे

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.