बाप्पाचे भाविक व सेवेकऱ्यांचा सेवेचा ‘हॅश टॅग बाप्पा’ चा आगळा-वेगळा उपक्रम.*
माई मिडिया24 आणि ब्रँड्स मेकर्स व मुंबईचा गणेशोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हॅश टॅग बाप्पा’ उपक्रमांतर्गत डॉक्टर भूषण जाधव व शशिकांत पवार (शाखाप्रमुख २१७) यांच्या सहकार्याने बाप्पाचे भाविक व सेवेकर्याच्या सेवेचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘हॅश टॅग बाप्पा’ उपक्रमाच्या माध्यमातून यंदा प्रथमच गणेशोत्सवामध्ये मुंबईतील विविध भागांत एकूण ६०,००० पौष्टिक ‘ग्रीक योगर्ट’ चे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नुकतेच मरिन लाईन्ससह ‘खेतवाडी गिरगांव’ येथे गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसेच गणपती मंडळांना पौष्टिक ‘ग्रीक योगर्ट’ चे वाटप करण्यात आले. शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, माईमिडिया24 च्या शीतल करदेकर, चेतन काशीकर, प्रानुभूती फाऊंडेशनचे डॉ भूषण जाधव, मुन चॅरिटेबल ट्रस्ट चे रवी जैन, ब्रँड्स मेकरचे भरत शिंदे, समाज सेवक शशिकांत पवार, रोहित महाडिक यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. पुढील दोन / तीन दिवसात लालबाग, फोर्ट, दादर, सांताक्रूझ, अंधेरी, या ठिकाणी ‘ग्रीक योगर्ट’ चे वाटपाने आगळावेगळी सेवा गणेशचरणी रुजू होणार आहे.