“पाच लाख नागरिकांच्या सहभागातून भव्य आयोजन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

स्व. वसंतराव नेवासकर स्मृती व्याख्यानात राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोपे यांचा सन्मान

 नाशिकमध्ये पार पडलेल्या वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आयोजित स्वर्गीय वसंतराव नेवासकर स्मृती व्याख्यान कार्यक्रमात अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ (नवी दिल्ली) चे राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोपे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

हा सन्मान ओबीसी आणि जातीनिहाय जनगणना नेते छगनराव भुजबळ आणि बारा बलुतेदार संघटनांचे नेते अरुणभाऊ नेवासकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर अनंतराव जांगजोड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

या वेळी बोलताना भास्करराव टोपे यांनी आगामी संत नामदेव एकात्मता विश्व महासम्मेलनास शुभेच्छा दिल्या. “पाच लाख नागरिकांच्या सहभागातून हे भव्य आयोजन होत असून, मी स्वतः सहभागी होईन,” असे सांगून त्यांनी आयोजन टीमचे विशेष कौतुक केले.

सामाजिक समतेचा आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात जनतेचा मोठा सहभाग दिसून आला.

#PositiveWatch #NashikNews #SamajEkta #SantNamdev #SocialUnity #वसंतव्याख्यान्माला

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.