प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत राधानगरी तालुक्यातील 9 विकास कामांना 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर – प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

पर्यटनदृष्ट्या विकसीत करण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर प्रयत्नशील…

गारगोटी प्रतिनिधी – राधानगरी तालुक्यातील 9 गावातील विविध विकास कामांसाठी शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 11 मार्च रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या विविध विभागांमधून राधानगरी विधानसभा मतदार संघासाठी जास्तीत-जास्त निधी कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू असतात. राधानगरी विधानसभा मतदार संघामध्ये पर्यटनदृष्ट्या विकसीत करण्यासाठी मोठा वाव असून मतदार संघ पर्यटनदृष्ट्या विकसीत करण्यासाठी माझा प्रयत्न सुरू असतो. राधानगरी तालुक्यातील पर्यटन स्थळे विकसित करण्याच्या दृष्टीने विविध पर्यटन स्थळांच्या अंतर्गत येणाऱ्या देवस्थानांना पायाभुत सुविधा पुरवून त्या ठिकाणी विविध पर्यटक, भाविक, नागरिक यांना विविध सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. या प्रयत्नांना यश आले असून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून आता देवस्थानांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास होणार आहे.

यामध्ये कसबा तारळे येथील हनुमान मंदीरसाठी सभामंडप बांधकाम व परिसर विकसीत करणे 1 कोटी, घोटवडे येथील हनुमान हनुमान मंदीरसाठी सभामंडप बांधकाम व परिसर विकसीत करणे 70 लाख, जोतिर्लिंग देवालय सावर्डे (पा.) येथील परिसर सुशोभिकरण करणे 50 लाख, जोतिर्लिंग देवालय आवळी बुद्रुक येथील परिसरात सुशोभिकरण करणे 50 लाख, चक्रेश्वरवाडी येथील शिखर परिसर खगोलीयदृष्ट्या महत्वाचा असल्याने वॉच टॉवरसर अन्य सोई सुविधा उपलबध करून परिसर सुशोभिकरण करणे 100, राज्य मार्ग घोटवडे येथे स्वागत कमान व जंक्शन सुधारणा करणे 30 लाख, राज्यमार्ग शेळेवाडी येथे स्वागत कमान व जंक्शन सुधारणा करणे 30 लाख, राज्य मार्ग दाजीपूर (ओलवण) येथे स्वागत कमान व जंक्शन सुधारणा करणे 35 लाख, बुजवडे येथील खुळोबा देवालय कडे जाणारा रस्ता व परिसर विकसीत करणे 35 लाख, लाख आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांचे सहकार्य लाभले असल्याचे म्हटले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.