श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिरास थेट वंशज नामदास महाराज यांची सदिच्छा भेट

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिरास थेट वंशज नामदास महाराज यांची सदिच्छा भेट
मंचर (आंबेगाव), पुणे |

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यस्मृतीचे स्मरण करत, त्यांचे थेट १७वे वंशज ह.भ.प. श्री निवृत्ती महाराज नामदास (पंढरपूर) यांनी मंचर तालुक्यातील आंबेगाव येथील श्री संत नामदेव महाराज मंदिरास नुकतीच विशेष सदिच्छा भेट दिली.

या दौऱ्यात नामदास महाराज यांच्यासोबत नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री सिद्धेशजी हिरवे, पुणे जिल्हा सचिव निलेशजी काळे, तसेच  रामजी मुळे, हरीजी कीर्तने, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.

या वेळी मंचर येथील नामदेव शिंपी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थित राहून नामदास महाराज यांचे जल्लोषात स्वागत-सत्कार केले. मंदिरात मंत्रोच्चार, अभिषेक व सामूहिक नामस्मरणाचा कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी बोलताना नामदास महाराज यांनी, पंढरपूर येथे शुक्रवार दिनांक ११ जुलै २०२५ ते बुधवार दिनांक ६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आयोजिल्या जाणाऱ्या श्री संत शिरोमणी नामदेव महाराज व संत जनाबाई समाधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. त्यांनी सर्व समाज बांधवांना “या सोहळ्याला आपल्या वेळेनुसार उपस्थित राहून आध्यात्मिक ऊर्जा अनुभवावी,” असे आवाहन केले.

या भेटीचे यशस्वी आयोजन पुढील कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून पार पडले:
नामदेव शिंपी समाज मंचरचे अध्यक्ष प्रमोद शेठ कडधेकर, उपाध्यक्ष गणेशजी क्षीरसागर, कार्याध्यक्ष राजेंद्रजी क्षीरसागर, अंकित घाम, शशांक शेठ कडधेकर, विश्वास काळे गुरुजी, विकास सुपेकर, संतोष काळे, प्रशांत काळे, संगीत काळे, अनिल काळे, मोहन काळे, दिगंबर बुदगे, सुनील बकरे, प्रकाश रेणुगदास, प्रमोदजी रेणुकदास, प्रमोद सोनवणे, संजय कडधेकर, दिलीप काळे, सौ. सोनाली काळे, मनाली क्षीरसागर आदींच्या प्रयत्नातून ही ऐतिहासिक भेट साध्य झाली.

नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र राज्य – माहिती व प्रसारण विभाग

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.