महसूल विभागातील ३०६ जणांना पदोन्नतीने पदस्थापना – राधाकृष्ण विखे पाटील

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

अव्वल कारकून व मंडळ अधिकारी बनले नायब तहसिलदार…

मुंबई – एकीकडे राज्याच्या महसूल विभागात आधुनिकता आणत असताना विभागातील अधिकाऱ्यांनाही पदोन्नतीने पदस्थापना देत सुंदर मेळ साधला आहे. आज महसुल विभागामध्ये अव्वल कारकून व मंडळ अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या एकूण 306 कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार (राजपत्रीत, गट-ब) या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे., अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राज्याच्या कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपुर या महसुल विभागामध्ये अव्वल कारकून व मंडळ अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या एकूण 306 कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार (राजपत्रीत, गट -ब) या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात (छत्रपती संभाजीनगर 8, जालना 5, परभणी16, हिंगोली4 , बीड 5, लातूर 5 , धाराशिव 8, नांदेड 8) एकूण 59. अमरावती विभागात (अमरावती 14, अकोला 10, बुलडाणा 14, वाशिम 7, यवतमाळ 6) एकूण 52 नागपुर विभागात (नागपुर 12, भंडारा 4, गोंदिया 6, चंद्रपुर 18, गडचिरोली 13, वर्धा 4) एकूण 57 नाशिक विभागात(नाशिक 9, अहमदनगर 10, जळगाव.9, धुळे 4, नंदुरबार4) एकूण 36 कोकण विभागात (मुंबई शहर 13, मुंबई उपनगर 22, ठाणे 17, पालघर 9, रायगड 19, रत्नागिरी 13, सिंधुदुर्ग 6, विभागीय आयुक्त कोंकण यांचे कार्यालय 2, राज्य निवडणूक आयोग 1) एकूण 102.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.