![]() ![]()
|
स्टार एअरवेजच्या ‘मुंबई-कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवेस प्रारंभ
कोल्हापूर : आता चिंता नकाे… काेल्हापूरवासियांची माेठी चिंता मिटली. काेल्हापूरकरांना आता थेट मुंबईला राेज विमानाने जाता येणार. रविवारी नवरात्राेत्सवाच्या निमित्ताने विशेष सेवेला आज प्रारंभ झालाय. नवरात्रोत्सवात घटस्थापनेच्या मुहूर्तावर स्टार एअरवेजचे विमानाने सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी ७९ कोल्हापूरकर वासियांना अवघ्या तासाभारात मुंबईत पाेहाेच केले.
नवरात्रोत्सवात घटस्थापनेच्या मुहूर्तावर रविवारी सकाळी स्टार एअरवेजचे विमान कोल्हापूर विमानतळावरून मुंबईकडे झेपावले.दरम्यान, बंगळूरुहून आलेल्या या विमानाचे कोल्हापूर विमानतळावर जाेरदार स्वागत झाले. येथील विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ‘वॉटर सॅल्यूट’ने केलेले स्वागत अनेकांचे खास आकर्षण ठरले. या विमानाने ७९ कोल्हापूरकरांनी आज या विमानसेवेचा आनंद व अनुभव घेतला. हे विमान तासाभरात म्हणजे अकरा वाजून पन्नास मिनिटांनी मुंबई विमानतळावर उतरले.
‘मुंबई-कोल्हापूर-मुंबई’ या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून मागणी विमान सुरु करावी अशी मागणी हाेती. याचा पाठपुरावा खासदार धनंजय महाडीक यांनी केला. त्याच पार्श्वभूमीवर आज नवरात्राेत्सवाच्या निमित्ताने हा याेग जुळून आला. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत ही सेवा सुरु झाली आहे. रविवारी पासून या विमानसेवेला कोल्हापूर विमानतळावरुन सुरूवात झाली. पहिल्या दिवशी एकूण १५८ जणांनी प्रवास केला. खासदार धनंजय महाडिक, स्टार एअरवेज एअरलाईन्सचे कर्मचारी कोल्हापूर विमानतळाचे व्यवस्थापक अनिल शिंदे आणि उत्साही कोल्हापूरकरांच्या उपस्थितीत या विमानाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यामध्ये १२ बिझनेस क्लासमधील प्रवाशांचा समावेश आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते कोल्हापूरातील प्रवाशांना मुंबईला जाताना, गुलाबपुष्प आणि बोर्डिंगपास देण्यात आले. या विमानातून अमरेंद्र महाडिक या एक वर्षाचा सर्वात छोट्या प्रवाशाने प्रवास केला. त्याच्यासोबत त्याचे वडील पृथ्वीराज आणि आई वैष्णवी होते. खा. महाडिक यांनी कोल्हापुरातून मुंबईकडे उड्डाण करणाऱ्या विमानाचे फ्लॅग ऑफ केले.
-
विमान कसे धावले.. कसे पाेहाेचले पहा
- रविवारी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी बंगळूरुहून उड्डाण केले.
- १० वाजून २० मिनिटांनी हे विमान कोल्हापुरात आले.
- १० वाजून ५० मिनिटांनी ते मुंबईकडे उडाले आणि मुंबईला ११ वाजून ५० मिनिटांनी पोहोचले.
हे विमान ३ वाजून ४० मिनिटांनी मुंबईहून कोल्हापूरकडे निघाले आणि ४ वाजून ४० मिनिटांनी कोल्हापूरात पोहोचले.
- याच विमानाने ५ वाजून १० मिनिटांनी बंगळूरुकडे उड्डाण केले.
केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलादमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांचे कोल्हापूरच्या विमानतळाकडे विशेष लक्ष
खासदार धनंजय महाडीक म्हणाले की आपल्या काेल्हापूर विमानतळाकडे विशेष लक्ष आहे. यावेळी खासदार धनंजय महाडीक यांनी काेल्हापूर विमानतळावर सुरू असलेल्या टर्मिनल इमारतीच्या कामाची पाहणी केली. यावेळी काही सूचना देताना ते म्हणाले की, टर्मिनल इमारत दिवाळीपर्यंत नक्की पूर्ण हाेईल, अशी आशा आहे. केंद्रीय हवाई वाहतूकआणि पाेलादमंत्री ज्याेतिरादित्य सिंदिया यांचे काेल्हापूरच्या विमानतळाकडे विशेष लक्ष आहे, त्यांनी हे विमानतळ अद्ययावत व्हावे यासाठी टर्मिनल इमारतीसाठी २७४ कोटी रुपये दिले असेही सांगितले.