राधानगरी व भुदरगड तालुक्यातील 4 गावातील दलितवस्तीमध्ये सौरहायमास्ट बसाविण्यासाठी 20 लाख रुपये निधी मंजूर – प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

दलितवस्तीमध्ये सौर हायमास्ट बसविण्यासाठी जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपययोजना (विशेष घटक योजना) योजनेतून निधी मंजूर…

गारगोटी प्रतिनिधी – राधानगरी विधानसभा मतदार संघातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक व कसबा वाळवे व भुदरगड तालुक्यातील गारगोटी व कुर गावातील दलितवस्तीमध्ये सौर हायमास्ट बसविण्यासाठी जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपययोजना (विशेष घटक योजना) योजनेतून प्रत्येक 5 लाख याप्रमाणे 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, राधानगरी विधानसभा मतदारसंघात असलेल्या दलित वस्ती मध्ये विविध विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजनेत कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला असून सदरची अनेक कामे पुर्ण झालेली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. सद्यस्थितीमध्ये राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथे 200 वॅट व 6 मीटर सौर हायमास्ट बसविणेसाठी 5 लाख, कसबा वाळवे येथे 200 वॅट व 6 मीटर सौर हायमास्ट बसविणेसाठी 5 लाख व भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे 200 वॅट व 6 मीटर सौर हायमास्ट बसविणेसाठी 5 लाख व कूर येथे 200 वॅट व 6 मीटर सौर हायमास्ट बसविणेसाठी 5 लाख आदी निधी मंजूर करण्यात आला असल्याचे सांगितले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.