निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत डॉ. अभिजीत माने, डॉ. सुरेश माने, सुयोग पाटील यांच्यासह प्राध्यापक.
साळोखेनगर – डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग साळोखेनगर येथील स्थापत्य अभियांत्रिकीच्या १७ विद्यार्थ्यांची ‘डीएचडी इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड’ या नामवंत कंपनीमध्ये निवड झाली आहे. अंतिम वर्षाच्या पहिल्याच सेमिस्टरमध्ये या विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना 3 लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे. ‘डीएचडी इन्फ्राकॉन प्रा. लि.’ ही एक भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून ती प्रामुख्याने रस्ते बांधकाम, महामार्ग प्रकल्प, पूल बांधकाम तसेच इतर नागरी पायाभूत प्रकल्पांवर काम करते.
कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले, स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळालेली ही संधी अभिमानस्पद आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतानाच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावरही भर दिला जातो. विविध परीक्षांची तयारी, मुलाखतीचे प्रशिक्षणही दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या प्लेसमेंटसाठी फायदा होत आहे. प्राचार्य डॉ. सुरेश माने म्हणाले, महाविद्यालयामार्फत इंडस्ट्रियल व्हिजिट्स, गेस्ट लेक्चर्स, हँड्स-ऑन ट्रेनिंग सेशन्स, वर्कशॉप अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये औद्योगिक कौशल्यांचा विकास होऊन त्यांना करियरच्या उत्तम संधी उपलब्ध मिळत आहेत.
या निवडीबद्द संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. अभिजीत माने, डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, स्थापत्य अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. अभिजीत पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. प्रीती भोसले यानी अभिनंदन केले.