सुनावणी ‘बँक बचाव समिती’च्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करा-‘बँक बचाव समिती’
{शिरपूर – गोपाल के. मारवाडी}
‘बँक बचाव समितीच्या ‘च्या तक्रारीवरून दि शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँकेचे अध्यक्ष प्रसन्न जयराज जैन यांना जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी अपात्र केले आहे. समितीने जिल्हा उपनिबंधकांचे योग्य ती कार्यवाही केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे. आतापर्यंतची अनेक नियमबाह्य व तद्दन गंभीर फसवणूकीची प्रकरणे पाहता शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँकेत गेल्या 5-10 वर्षांपासून कमालीची अनियमितता असून कोटय़वधी रुपयांचे बेकायदेशीर व अंदाधुंद कर्ज कोणत्याही तारण हमीशिवाय नियमबाह्य वाटप केल्यामुळे तिचा एनपीए 77 टक्क्यांवर गेला आहे.
गेल्या 3 वर्षांपासून सतत ‘क’ श्रेणीत आहे.आडिटरच्या रिपोर्ट मध्ये अजब- गजब प्रकरणे उजेडात येताहेत.शहरातील सुपरशॉपी चा नौकर म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीला 50 लाखांचे तेही नियमबाह्य, विनामार्गेज कर्ज वितरण केले आहे.अशी सुमारे पन्नास-साठ मर्जीतल्या लोकांची नियमबाह्य पन्नास लाख ते कोटी-कोटीच्या रकमेची उड्डाणे या बँकेने दिलेली आहेत. एका रिक्शा चालकाला कोणत्याही आवश्यक कागदपत्रांशिवाय नियमबाह्य व विनातारणी पन्नास लाखांचे कर्ज वितरण केले आहे ते तीन वर्षांपासून थकबाकी होऊन सुमारे 85 लाखांच्या घरात गेले आहे. आता ते चव्हाट्यावर आले आहे.बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन अर्ध्या कोटींचे कर्ज वितरण केले असल्याचे समजते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे संचालक मंडळ व या बँकेच्या विद्यमान मॅनेजर यांनी सहकार कायदा, नियम उपविधी आणि रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग नियमन कायद्याचे सरसकट उल्लंघन करून गेल्या ५ वर्षातील दोष-दुरुस्ती अहवाल जिल्हा उपनिबंधकांना आणि शासकीय लेखापरीक्षक सहकारी संस्था यांच्याकडे आजतागायत सुद्धा सादर केलेला नाही.
‘बँक बचाव समिती’ चे जागरूक सदस्यांनी यासंदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या दोन्ही महत्त्वाच्या सहकारी संस्था नियामक अधिका-यांच्या सहीने संपूर्ण लेखी माहिती मिळविली आहे.मागील पाच वर्षांचे दोष-दुरुस्ती अहवाल आजपावेतो दि शिरपुर मर्चंटस को-ऑप बँकेच्या मॅनेजर व संचालक मंडळाने पाठविलेच नाहीत ही गंभीर बाब याद्वारे उघडकीस आली आहे. अंतरिम लेखापरीक्षकांच्या आडिट रिपोर्ट नंतर, दोष-दुरुस्ती अहवाल दरवर्षी दोन महिन्याच्या आंत सादर करणे बंधनकारक आहे.तरीही या संदर्भात बँक मॅनेजर आणि संबंधितांनी कोणत्याही आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
कारण याच्या आड पन्नास लाख ते कोटी-कोटीच्या उड्डाणे घेतलेले मोठं मोठे लाभार्थ्यांची कर्जाची वेळ सोयीस्कर पणे दुर्लक्ष करून वेळ निभावून नेण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली जात होती.ही बँक आणि हीचे सभासद गेले खड्डयात ? असे धोरणचं जणू सर्व जबाबदार सहकारी व शासकीय विभागांनी अवलंबिले आहे, असे दिसत आहे. या विरोधात लवकरच आर्थिक अपराध शाखा व प्रसंगी उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात येईल. असे जागरूक सभासदांनी एकत्र येऊन संकल्प केला आहे. आता ‘सभासद जगाओ, भ्रष्टाचार भगाओ!’ आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
या बातम्या देखील जास्त वाचल्या गेल्या…
दि. शिरपूर मर्चंटस् को-ऑप बँक लि. बँकेचे चेअरमन प्रसन्न जयराज जैन अपात्र घोषित…
गोपनीयतेच्या गोंडस नावाआड लपलेला भ्रष्टाचार उघडकीस…