मिळणार माफक दरात सेवा…जाणून घ्या. तुमच्यासाठी आहेत, खास या याेजना

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना– सी.एस.सी. केंद्र
– व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख
सांगली:  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना आता सी.एस.सी. केंद्रामधून (Common Service Centre) महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी माफक दरात सेवा मिळणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.याबाबतचा सामजस्य करार (MOU) महामंडळाच्या मुख्य कार्यालयामध्ये महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख व सी.एस.सी. केंद्राचे प्रमुख वैभव देशपांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. या करारानुसार, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लाभार्थी आता त्यांच्या जवळच्या कोणत्याही सी.एस.सी. केंद्रावर जाऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ कमी दरात घेऊ शकतील. यामध्ये महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, योजनेची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.
सी.एस.सी. केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध सरकारी आणि खासगी सेवा पुरवण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. महामंडळाने सी.एस.सी. केंद्रासमवेत केलेल्या करारामुळे महामंडळाच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल.
सी.एस.सी. केंद्रांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना त्यांच्या गावातूनच पात्रता प्रमाणपत्र (LOI) कागदपत्र, बँकेचे कर्ज मंजुरी (Bank sanction), बँकेचा हप्ता (bank statement) अपलोड करण्यासाठी प्रत्येकी रु. 70/- शुल्क आकारण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
या करारामुळे लाभार्थ्यांचा वेळ वाचणार आहे आणि त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज लागणार नाही. ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना मिळेल. या नवीन उपक्रमामुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि किफायतशीर होईल, असे मत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

मातोश्री मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेशासाठी 20 सप्टेंबरची मुदत

सांगली : मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृह, सांगली या वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येत आहेत. या वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या निवासाची व भोजनाची मोफत सुविधा पुरविली जाते. प्रवेशासाठी अर्ज वाटप व स्विकृतीची मुदत 20 सप्टेंबर 2025 पर्यंत असल्याचे वसतीगृह प्रमुख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.प्रवेशासाठी माध्यमिक विभाग (इयत्ता ८ वी १० वी) 20 जागा, उच्च माध्यमिक विभाग (इयत्ता ११ वी व १२ वी) 26 जागा, महाविद्यालयीन विभाग (बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी) 22 जागा व आय.टी.आय विभाग यासाठी 20 जागा अशा एकूण 88 जागा उपलब्ध असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.