भागवत सप्ताहाच्या तृतीय दिवशी जन्माष्टमीचा जिवंत देखावा…!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

भक्ती आणि श्रद्धेच्या अपूर्व जल्लोषात साजरा झाला श्रीकृष्ण जन्मोत्सव..!

भागवत सप्ताहाच्या तृतीय दिवशी जन्माष्टमीचा जिवंत देखावा…

मथुरा /नाशिक (प्रतिनिधी): गोवर्धन येथे सुरू असलेल्या भागवत सप्ताहाच्या तृतीय दिवशी भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्ती आणि श्रद्धेच्या कल्लोळात तितक्याच अपूर्व उत्साहात अन् जल्लोषात भंडाऱ्याची उधळण करीत अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या जिवंत देखाव्यामुळे या उत्सवाची रंगत आणखीनच वाढली आणि हजारो सेवेकर्‍यांचा उत्साह शिगेला पोहोचला.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण भूमी गोवर्धन मथुरा येथे २७ जूनपासून भागवत सप्ताह सुरू झाला आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने दर दिवशी विविध सेवा आणि उपक्रम आयोजित केले जातात. सप्ताहाच्या तृतीय दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव अपूर्व उत्साहात सेवेकर्‍यांनी साजरा केला. प्रत्यक्ष जन्माष्टमीचा जिवंत देखावा तसेच श्रीकृष्ण आणि गोपिकांचे नृत्य सादर करण्यात आल्यामुळे सेवेकऱ्यांच्या आनंदाला आणि उत्साहाला पारावर राहिला नाही. सहभागी सारे सेवेकरी देहभान हरपून या सोहळ्यात सहभागी झाले.

गुरुमाता सौ. मंदाकिनीताई मोरे यांनी स्वतः श्रीकृष्णाच्या वेशभूषेतील एका बालकाला उचलून घेऊन त्याचे कौतुक केले. व्यासपीठावर सादर करण्यात आलेल्या जिवंत देखाव्यामुळे आणि जन्मोत्सवाच्या सोहळ्यामुळे संपूर्ण सभामंडप जय कन्हैया लाल की..च्या जयघोषात दुमदुमून गेला. यानिमित्ताने सुयोग्य संतान प्राप्तीकारक संतान गोपाळ मंत्रानुष्ठान आणि श्रीकृष्ण दोलोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थित सारे सेवेकरी दीर्घकाळ या आनंदात रममाण झाले होते. या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून व्यासपीठावर कार्ष्णि आश्रमातील गुरु श्री हरीओम बाबा महाराज उपस्थित होते. गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला.

कात्यायनी आणि गिरीराज गोवर्धन पूजन..

सप्ताहाच्या चतुर्थ दिनी नेहमीप्रमाणे भागवताचे पठण झाल्यानंतर दुपार सत्रात मुख्य याज्ञिकी श्री.दीपकशास्त्री मुळे यांनी भागवतावर रसाळ निरूपण केले. त्यानंतर कन्या विवाहकारक श्री कात्यायनी पूजन व मंत्रानुष्ठान तसेच धनधान्य समृद्धीकारक श्री गिरीराज गोवर्धन पूजन व अन्नकूट या धार्मिक सेवा आणि उपक्रम उत्साहात पार पडले. उद्या मंगळवार दि १ जुलै रोजी विवाहकारक श्रीकृष्ण- रुक्मिणी कल्याणोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.