चलो पंढरपूर…. अखंड हरिनाम उत्सव!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

 

|| *श्री संत नामदेव महाराज प्रसन्न.* ||

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, संत जनाबाई व संत नामदेव महाराज परिवार यांचा शष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी समाधी वर्ष निमित्ताने पंढरपूर येथे *गुरुवार दिनांक ११/०७/२०२५ ते बुधवार दिनांक ०६ ०८/२०२५ रोजी संपूर्ण महिनाभर अखंड हरिनाम उत्सव आयोजित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे दिनांक *२३ जुलै व २४ जुलै रोजी* *महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  व प्रमुख मान्यवर मंडळी या उत्सवास उपस्थित राहणार आहेत त्यातीलच एक महत्त्वपूर्ण अपेक्षित उपस्थिती आनंदजी पिंपळकर आनंदी वास्तू (प्रसिद्ध ज्योतिर्विद)* यांना श्री संत नामदेव महाराज वंशज परिवार तसेच नामदेव शिंपी समाज युवक संघाच्या वतीने कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र अध्यक्ष  सिद्धेशजी हिरवे व नामदेव शिंपी समाज युवक संघाचे पुणे जिल्हा सचिव श्री निलेशजी काळे यांनी आज त्यांचे कार्यालय आनंदी वास्तू, विमान नगर पुणे येथे प्रत्यक्ष पत्रिका भेटून दिली यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले त्याचबरोबर त्यांचे वतीने त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन *संत नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळा उत्सवास पंढरपूर येथे उपस्थित रहावे असे आनंद पिंपळकर यांचे वतीने सर्वांना आवाहन प्रसिद्धी माध्यमाद्वारे त्यांनी केले.*

*माहिती व प्रसारण विभाग.*
*नामदेव शिंपी समाज युवक संघ,महाराष्ट्र.*

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.