जी.जी.पाटील, शिराळा
चांदोली अभयारण्या शेजारील दहा किलोमीटर अंतरावरील शेतशिवारात वानरे ऊस,भुईमूग, पावटा इ.चा पाडतात मोर ,लांडोरी पेरलेलं धान्य व आलेले मोड उगवूच देत नाहीत. गवे उभी पिके फस्त करतात .बिबटे मानवावर व पाळीव प्राण्यांवर हल्ले करतात. इथले उदरनिर्वाहाचे साधनच वन्याप्राण्याकडून हिरावून घेतले जात आहे.मणदूर, उखळू या गावातील कित्येक एकर शेती पिकाविना पडून आहे.त्यामुळे आम्ही जगायच कसं असा सवाल चांदोली अभयारण्या शेजारील गावे व वाड्यावस्तीवरील शेतक-यांच्यातून उपस्थित केला जात आहे. शिराळा तालुक्यातील पश्चिम विभागातील सोनवडे, मणदूर, आरळा, मिरुखेवाडी, जाधववाडी, कोळेकरवाडी,मणदूर धनगरवाडा, खुंदलापूर, तर शाहुवाडी तालुक्यातील उखळू,शित्तूर, शिराळे,खेडे यासह वाड्यावस्तीवरील बिबट्यांचे पाळीव प्राणी तसेच मानवावरील होणारे हल्ले सध्या चिंतेचा विषय बनू लागला आहे.
वानराकडून ऊसाचा फडशा पाडला जातो,भुईमूग, पावटा,मका ही पिके शेतक-यांच्या पदरात पाडू देत नाहीत.गवे उभी पिकेच फस्त करतात.तर मोर ,लांडोरी तर पेरलेले धान्य उकरून खावून टाकतात.पेरलेले उगवूच देत नाहीत.तर बिबटे व हिंस्र वन्य प्राण्यांकडून पाळीव प्राण्यांच्या वरील हल्ल्यामुळे नुकसान होऊ लागले आहे.
या परिसरात शेती हा मुख्य व्यवसाय आहे.त्याला जोडधंदा म्हणून शेळ्या मेंढ्या ,गाईम्हशी हे उदरनिर्वाहाचे जगण्याचे प्रमुख साधन आहे.तेच आता बिबटे व जंगली हिंस्र प्राणी हिरावून घेत आहेत. शासनाकडून ही तुटपुंजी मदत मिळत आहे. मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.तरीही शासनाचा वन्यजीव विभाग मुग गिळून गप्प का ? असा सवाल शेतक-यांच्यातून उपस्थित होत आहे.यानिमित्ताने पुन्हा एकदा अभयारण्या भोवताली कुंपनाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. शासनाच्या वन्यजीव विभागाकडून ठोस उपाययोजनां करणे आवश्यक आहे.अन्याथा येथील शेतकरी उध्वस्त होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
अभयारण्यात खाद्याची कमतरता,पर्यटनाच्या गाड्यांचा कर्कश आवाज यामुळेच जंगलातील बहुतांश प्राणी खाद्याच्या शोधासाठी मानवी वस्ती जवळपास व ऊसाच्या फडात आश्रय घेवू लागलेत.सहजच शिकार उपलब्ध होत असल्याने अभयारण्यात वन्यप्राणी दिसेना झालेत.याचा वन्यजीव विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.