सहायक आयुक्त, समाज कल्याण कोल्हापूर कार्यालयामार्फत संविधना दिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या कालावधी समता पर्व म्हणून साजरा करण्यात येणार आहे. समता पर्वामध्ये दरदिवशी सहायक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा जाती प्रमाणपत्र समिती, कोल्हापूर यांच्याद्वारे विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमीत्त संविधान रॅली सकाळी 8.30 वा.बिंदू चौक येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करुन ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- कोल्हापूर महानगरपालिका – गगांराम कांबळे यांची समाधी असे मार्गक्रमण करुन पुढे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय चौकातून- दसरा चौक येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन समारोप करण्यात येणार आहे. अशा पध्दतीने संविधान दिनी संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- दि.27 नोव्हेंबर रोजी मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा व वि.जा.भ.ज.आश्रमशाळा येथे निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, लेखी परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा व इतर कार्यक्रम तर दि. 28 नोव्हेंबर रोजी सर्व कनिष्ठ व वरीष्ठ महाविदयालये येथे निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, लेखी परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा व इतर कार्यक्रम होणार आहेत. दि.29 नोव्हेंबर रोजी स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन न्यू पॅव्हेलियन हॉटेल,महावीर गार्डन जवळ कोल्हापूर येथे करण्यात येणार आहे. दि.30 नोव्हेंबर रोजी जेष्ठ नागरिकांचे कल्याण अंतर्गत व्याख्यान तर संविधान या विषयाशी संबंधीत चित्रकला स्पर्धा कलानिकेतन महाविदयालय येथे होणार आहे.
- दि. 1 डिसेंबर रोजी जादूटोणा व संविधान जनजागृती कार्यक्रम विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे तर दि.
- 2 डिसेंबर रोजी सामाजिक न्याय भवन येथे जिल्हास्तरावरील युवा गटांची कार्यशाळा व जिल्हयातील विविध तालुक्यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांना भेटी देण्यात येणार आहेत.
- दि. 3 डिसेंबर रोजी तृतीयपंथीय कल्याण व हक्काचे संरक्षण अंतर्गत तृतीय पंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देणेबाबत शिबीर डी.के.टी.ई महाविदयालय, इचलकरंजी येथे होणार आहे.
- दि. 4 डिसेंबर रोजी विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रमशाळा, पाचगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम तर
- दि. 5 डिसेंबर रोजी छत्रपती शहाजी महाविद्यालय दसरा चौक कोल्हापूर येथे संविधानाचे महत्त्व व भविष्याचा वेध या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि. 6 डिसेंबर रोजी डॉ.आंबेडकर महापरीनिर्वाण दिन कार्यक्रमा निमित्त कार्यालयाच्या ठिकाणी तसेच बिंदू चौक या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन समता पर्वाचा समारोप करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 26 नोव्हेंबर 2022 रोजी लोकशाही गप्पा- भाग 8 ‘जगण्यातलं संविधान’ या विषयावर सकाळी 11 वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. कशासाठी? लिंगभाव समतेसाठी या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांच्या सहभागाने होणाऱ्या या परिसंवादाला विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.