WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

‘सनी’ …समाजातील कटू वास्तव पहायचे तर ‘सनी’ पहा!

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम आहे. त्याचबरोबर त्यात समाजाचे प्रतिबिंब पडते. चित्रपट स्वप्नांची आभासी दुनियेचे दर्शन घडते असे काही वेळा उपहासाने म्हटले जाते. मात्र अनेकदा समाजाचे कटू वास्तव चित्रपटांतून मांडले जाते. असाच काहीसा प्रयत्न हेमंत ढोमे या तरुणाने त्याच्या नव्या सनी चित्रपटांत केला आहे.

हेमंत आमच्या सेवानिवृत्त सहा. पोलीस आयुक्त ढोमे साहेबांचा चिरंजीव. त्याच्या झिम्मा या चित्रपटाने मागच्या वर्षी रसिकांत धुमाकूळ घातला होता. तो योगायोग नव्हता , तर हटक्या विषयांना स्पर्श करीत प्रत्येक वेळी वेगळी पाऊलवाट शोधण्याचा प्रयत्न हेमंत व त्याचे सहकारी करतात आणि त्यात ते यशस्वी पण होतात हे प्रकर्षाने जाणवते. आज या चित्रपटाचा स्पेशल शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटांतील कलाकारांच्या सोबतीने त्यांचा प्रयत्न जाणून घेता आला.

सनी हा नाशिकच्या बड्या राजकीय घराण्यातील शेंडेफळ. अतिशय लाडात वाढलेंल्या सनी बाळाचे पाऊल वाकडे पडते. त्याला सुधारण्यासाठी त्याचा मोठा भाऊ व्यवस्थापन शास्त्रातील ( MBA ) उच्च शिक्षणासाठी सरे ( इंग्लंड ) येथे पाठवतो. कुटुंब व घरापासून प्रथमच बाहेर राहिलेल्या सनीची अवस्था एखादे रोपटे उखडून नव्याने इतरत्र लावल्या प्रमाणे होती. स्वावलंबनाचे धडे ठाऊक नसलेल्या सनीने ही अस्वस्थता व्यसनात बुडवण्याचा मार्ग शोधला. पण जवळची पुंजी संपली आणि त्यात मोठ्या भावाने आर्थिक जबाबदारी नाकारली. अशा परिस्थितीत अर्थार्जनासाठी एका कॅफेत स्वीपरचे काम त्याला स्विकारावे लागले. या नवीन परिस्थितील जुळवून घेणे त्याच्या विलासी आणि मग्रूर स्वभावाला खूपच जड जाते. त्यातच त्याची शैक्षणिक वाटचाल पण खाच खळगे भरलेल्या मार्गावर चालली असते.

शिक्षणांत रस नाही, कुटुंबापासून दूर खडतर दिवस अशा जीवनांत त्याचे सूर सायको (वेडू) वाटणाऱ्या कॅफे मालकीण वैदेहीशी जुळतात . पतीशी असलेल्या वादातून होणाऱ्या घटस्फोटाने ती एकाकी पडलेली असते. नेमकी त्याच वेळी तिला गर्भारपणाची चाहूल लागलेली असते. या बिकट काळांत सनी वैदेहीच्या पाठीशी ढाल बनून उभा राहतो. वैदेही सनीच्या निरागस हास्यात आपल्या जीवनाचं भविष्य पाहत असते. दुर्देवाने तिचे प्रेम व्यक्त करण्यासाठी तिला संधीच मिळत नाही.

परिस्थितीचे टक्के टोणपे खाऊन सुधारलेल्या सनीला मायभूमीत परतण्याचे वेध लागतात. त्याच्या विरहाच्या कल्पनेने अस्वस्थ झालेली वैदेही सनीला समजत नाही. मात्र गावी परतल्यानंतर मित्रांच्या चेष्टा मस्करीतून त्याला वैदेहीची उणीव जाणवायला लागली. वेदेही घटस्फोटित , एका मुलीची आई आणि त्याही पेक्षा सनीपेक्षा ७ वर्षांनी वयाने थोरली ! मोहिते पाटलांच्या तालेवार घराण्यात अशा मुलीला सुन म्हणून स्विकारण्याची सनीच्या आईची मुळीच मानसिकता नसते. पण यावेळीही थोरला भाऊ सनीच्या पाठीशी उभा राहतो.

भारतीय समाज आजही सनातनी समजला जातो. शिक्षण आणि परदेशागमन यामुळे नविन परंपरा येथे रुजू पाहत आहेत. समाजातील हे बदल स्विकारले जात असून त्यांतून ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून मागितलेले वैश्विक नातं निर्माण होत आहे. आजच्या कलियुगांत समाजात होऊ पाहणारे बदल हेमंतच्या प्रयत्नातून पडद्यावर साकारले गेले. हेमतंची पत्नी क्षिती , ललित प्रभाकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या भूमिका जगल्या असेच वाटत होते. कौतुक हेमंतचे , तो खरा तर या चित्रपटाचा सुत्रधार ! पण त्याने पडद्यावर झळकण्याचा यत्किचितही खटाटोप न करता साऱ्या चित्रपटावर आपली छाप पाडली .

पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड हे ढोमे साहेबांचे मूळ गांव. पारगांव हे जवळचे मोठे गांव . त्यामुळे सनीची प्रिन्स ऑफ पारगांव म्हणून चित्रपटांच्या सुरुवातीला ओळख करुन दिल्याची तसेच त्यांतून गावची स्मृती जपल्याची गंमतीशीर आठवण ढोमे साहेबांनी जागवली. समाज बदलतोय , चित्रपटही त्याच बरोबर बदलत आहेत याची प्रकर्षाने जाणीव आज होत होती. त्यासाठी हेमंत व त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! काळाचा हा प्रवाह दुरुन पहायचा की आपण त्यांत सामील व्हायचे याच्या वाटा आपणच शोधायच्या !

साैजन्य- विशेष आभार-  मितेश घट्टे
अपर पोलीस अधीक्षक – पुणे ग्रामीण

 

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.